भाजपाच्या जन्माआधीपासूनच गुजरात विकसित, मोदींमुळे नाही; तोगडियांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 10:22 PM2019-05-11T22:22:02+5:302019-05-11T22:24:08+5:30

नरेंद्र मोदी यांच्यासोबत गेली 45 वर्षे मैत्री होती हे मान्य करताना त्यांनी वैयक्तीक टीका करण्यास नकार दिला.

Gujarat was already devloped, not by Narendra Modi; Pravin Togadia disclosures | भाजपाच्या जन्माआधीपासूनच गुजरात विकसित, मोदींमुळे नाही; तोगडियांचा खुलासा

भाजपाच्या जन्माआधीपासूनच गुजरात विकसित, मोदींमुळे नाही; तोगडियांचा खुलासा

मुंबई : राम मंदिराच्या मार्गावर जात असताना मोदींनी आपल्यावर विश्वासघाताचा आरोप केला. मात्र, मोदी पाकिस्तानात केक खायला पोहोचले. गुजरात आधीच विकसित होता. काँग्रेस, भाजपाच्या जन्माआधीपासून. यामुळे नरेंद्र मोदी यांच्यामुळेच गुजरातचा विकास झाल्याची अफवा असल्याचा आरोप विहिंपचे प्रवीण तोगडिया यांनी केला. 


एबीपी माझाने घेतलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते. नरेंद्र मोदी यांच्यासोबत गेली 45 वर्षे मैत्री होती हे मान्य करताना त्यांनी वैयक्तीक टीका करण्यास नकार दिला. त्यांना मोदी चहा विकत होते का, याबाबत माहिती देण्यास विचारले गेले होते. यावर त्यांनी मला देशाच्याबाबतीत बोलायचे आहे. भाजपासाठी हिंदुत्व हे निवडणुकांपुरते आहे. दिलेली आश्वासने कधीही त्यांनी पूर्ण केली नाहीत, असे आरोप करताना त्यांनी माध्यमांमध्ये हिंमत नसल्याने आपल्यावरील बदल्यांसाठी दबाव आणत असल्याच्या आरोपांबाबतची ध्वनीफित देत नसल्याचे सांगितले. वेळ आल्यावर देईन असेही ते म्हणाले.

मी नाही म्हणालो म्हणून मोदी मुख्यमंत्री बनले; तोगडियांचे मोठे गौप्यस्फोट

 

गुजरात भाजपाच्या जन्माआधीपासून विकसित होता. काँग्रेसचाही जन्म उशिराने झाला. माझे पणजोबा ऑफ्रिकेत जाऊन व्यवसाय करत होते. यामुळे नरेंद्र मोदी मुख्यमंत्री झाल्यावर गुजरातचा विकास झाल्याची ही निव्वळ अफवा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी गेल्या 5 वर्षात काहीही केले नसल्याचा आरोप केला. आधी राम मंदिर, नंतर शेतकरी, रोजगार आणि काहीच चालले नाही हे पाहून राष्ट्रवादाचा आसरा निवडणुकीत घेतल्याचा आरोप त्यांनी केला. 


मला देशासाठी राजकीय क्षेत्रात उतरावे लागले. कारण इतर मुद्द्यांवर बोललो तर दबाव टाकला जायचा. केवळ राम मंदिरावरच बोलावे लागायचे. यामुळे आता माझा आवाज दाबता येत नाही. आता मीच आवाज बनलो आहे, यामुळे रोजगार, शेतकऱ्यांचे प्रश्न, देशाच्या प्रश्नांवर बोलू शकतो. माझ्याकडे 500 पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत. लाखावर पक्षाचे कार्यकर्ते आहेत. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणारा, आरोग्य सुविधा देणारा प्रवीण तोगडिया पाहायला आवडेल, असे त्यांनी सांगितले. 


 

Web Title: Gujarat was already devloped, not by Narendra Modi; Pravin Togadia disclosures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.