गुजरातच्या अशांत क्षेत्र दुरुस्ती कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 02:24 AM2020-10-13T02:24:47+5:302020-10-13T02:25:08+5:30
अवैध मार्गाने संपत्ती हडप करण्यास पायबंद घालणाºया या कायदात तीन ते पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा आणि एक लाख रुपये किंवा एकूण संपत्तीच्या दहा टक्के दंडाची तरतूद आहे.
अहमदाबाद : गुजरात विधानसभेने मागच्या वर्षी संमत केलेल्या अशांत क्षेत्र दुरुस्ती कायद्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. गुजरातचे मंत्री प्रदीप सिंह जडेजा यांनी सांगितले की, हा कायद्याने धुव्रीकरण थांबेल. अशांत क्षेत्रात जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय एका समुदायाच्या लोकांना अन्य समुदायाच्या लोकांना संपत्ती विकण्यास मनाई असेल.
अवैध मार्गाने संपत्ती हडप करण्यास पायबंद घालणाºया या कायदात तीन ते पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा आणि एक लाख रुपये किंवा एकूण संपत्तीच्या दहा टक्के दंडाची तरतूद आहे. या कायद्यामुळे गैरप्रकारांना मोठ्या प्रमाणात आळा बसेल, असे म्हटले जाते.