कुटुंबात 12 सदस्य पण मिळालं फक्त एक मत; निकाल ऐकून उमेदवार ढसाढसा रडला, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 08:45 AM2021-12-22T08:45:05+5:302021-12-22T08:51:06+5:30
सरपंच पदासाठी लढणाऱ्या एका उमेदवाराची जोरदार चर्चा रंगली आहे. संतोषभाई हलपती असं या उमेदवाराचं नाव असून त्याला फक्त एकच मत पडलं आहे.
नवी दिल्ली - गुजरातमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला आहे. एकूण 8686 पंचायतींसाठी निवडणूक झाली असून सर्व गावांमध्ये बॅलेट पेपरने मतदान करण्यात आलं. जवळपास 77 टक्के मतदान झाल्याची माहिती मिळत आहे. या निवडणुकीदरम्यान अनेक घटना या समोर आल्या आहेत. निवडणूक म्हटलं की कोणाचा तरी विजय आणि कोणाचा तरी पराभव होणार हे निश्चितच असतं. पण अनेकदा एका मताने देखील मोठा फरक पडत असतो. अशीच एक घटना आता गुजरातच्या वापीमध्ये घडली आहे.
सरपंच पदासाठी लढणाऱ्या एका उमेदवाराची जोरदार चर्चा रंगली आहे. संतोषभाई हलपती असं या उमेदवाराचं नाव असून त्याला फक्त एकच मत पडलं आहे. विशेष म्हणजे त्याच्या घरातील 12 जणांनी मतदान केलं पण उमेदवाराला एकच मत पडल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कुटुंबातील सदस्यांनी देखील पाठ फिरवल्याने, मत न दिल्याने संतोष अत्यंत भावूक झाले. निकाल ऐकल्यानंतर ते ढसाढसा रडायलाचं लागले. घरातील मंडळींनी साथ न दिल्याचं त्यांच्या खूपच मनाला लागलं. त्यामुळे सध्या संतोष यांना निवडणुकीत पडलेलं मत हा एकच गावात चर्चेचा विषय आहे.
कुटुंबीयांनीही फिरवली पाठ, दिली नाही साथ
रिपोर्टनुसार, गुजरातच्या वापी जिल्ह्यातील छरवाडा ग्रामपंचायतीच्या वॉर्ड नंबर 5 मध्ये सरपंच पदासाठी संतोष उभे राहिले होते. त्यांना किमान आपल्या घरातीस सदस्य तरी मतदान करतील अशी आशा होती. मात्र 12 सदस्य असले तरी फक्त एकच मत मिळालं. हे ऐकून संतोष इतके भावूक झाले की काऊंटिंग सेंटरवरच मोठमोठ्याने रडू लागले. माझ्या कुटुंबातील सदस्यांनीही मला मत दिलं नाही असं म्हणत त्यांनी आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. गुजरातमध्ये सरपंच पदासाठी तब्बल 27 हजार उमेदवार मैदानात आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.