भरधाव डंपरने मिनी ट्रॅव्हरला दिली धडक, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू, १० जण जखमी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 20:08 IST2025-02-23T20:08:33+5:302025-02-23T20:08:51+5:30

Gujrat Accident News: गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यामध्ये लिंबडी-राजकोट महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. एका भरधाव येत असलेल्या डंपरने मिनी ट्रॅव्हलरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात  पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १० जण  जखमी झाले आहे.  

Gujrat Accident : A speeding dumper hit a Mini Traverse, five people died, 10 were injured in a horrific accident | भरधाव डंपरने मिनी ट्रॅव्हरला दिली धडक, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू, १० जण जखमी  

भरधाव डंपरने मिनी ट्रॅव्हरला दिली धडक, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू, १० जण जखमी  

गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यामध्ये लिंबडी-राजकोट महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. एका भरधाव येत असलेल्या डंपरने मिनी ट्रॅव्हलरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात  पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १० जण  जखमी झाले आहे.  

हा अपघात मोरवड गावाजवळील पुलावर झाला. येथे एका भरधाव डंपरने समोरून येत असेलल्या मिनी ट्रॅव्हलरला जोरात धडक दिली. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर १० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. या अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.  

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला असून, अपघातामागच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.  

Web Title: Gujrat Accident : A speeding dumper hit a Mini Traverse, five people died, 10 were injured in a horrific accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.