दुसऱ्या पत्नीच्या शरीराचे 11 तुकडे करुन निर्घृण हत्या, कारण वाचाल तर थक्क व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 08:49 AM2018-04-18T08:49:50+5:302018-04-18T09:13:08+5:30
... म्हणून त्यानं पत्नीच्या शरीराचे केले 11 तुकडे
अहमदाबाद - गुजरातमधील सूरत येथील थरकार उडवणारी एक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीनं आपल्या पत्नीची निर्घृण हत्या करुन तिच्या शरीराचे तब्बल 11 तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हत्या केलेल्या पत्नीच्या मृतदेहाच्या तुकड्यांची जंगलामध्ये विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करत असताना आरोपी पतीच्या संशयास्पद हालचाली पाहून तेथील काही जणांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी पतीला अटक केली आणि त्याच्या पत्नीच्या मृतदेहाचे तुकडेदेखील ताब्यात घेतले.
सूरतमधीर राणी तलाव परिसरात सोमवारी (16 एप्रिल ) ही घटना घडली आहे. येथील रहिवासी शाहनवाज युसुफ शेखनं दुसरी पत्नी जुलेखाची निर्घृण हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तब्बल 11 तुकडे केले. तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करत असताना त्याला कोणी तरी पाहिले व याबाबतची माहिती पोलिसांना दिली. शाहनवाजला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराकडे धाव घेत तपासणी केली. यावेळी अत्यंत भयावह प्रकार समोर आला. तपासणीदरम्यान शहनवाजच्या पत्नीचे डोके आणि हात घरात आढळले.
यासाठी केली दुसऱ्या पत्नीची हत्या
पोलीस तपासणीमध्ये शाहनवाजनं सांगितले की, त्याचा दोन वेळा निकाह झाला. दोन्ही पत्नीमध्ये दररोज कोणत्या-न्-कोणत्या कारणांवरुन भांडणं व्हायची. दररोजच्या वादाला कंटाळून शाहनवाजनं अखेर दुसरी पत्नी जुलेखाची हत्या केली आणि या गोष्टीचा कोणालाही थांगपत्ता लागू नये, यासाठी त्यानं पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन त्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने केलेले हत्याकांड अखेर उजेडात आलेत.
दोन वर्षांपूर्वी केला होता जुलेखासोबत निकाह
विवाहित असलेला शाहनवाज जुलेखाच्या प्रेमात पडला होता आणि दोन वर्षांपूर्वी त्यानं जुलेखासोबत निकाह केला. जुलेखासोबत निकाह झाल्यानंतर शाहनवाज पहिल्या पत्नीसोबतच एकत्र राहू लागला होता. मात्र यामुळे शाहनवाजच्या दोन्ही पत्नींमध्ये तुफान भांडणं होऊ लागली. दोघींमधली वादाला कंटाळून शेवटी त्यानं जुलेखाची हत्या केली. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या गुन्ह्यामध्ये शाहनवाजची पहिली पत्नी आणि बहीणदेखील सहभागी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Gujarat: Man kills wife, chops her body into 11 pieces in Surat. The accused Shahnawaz has been arrested by Police pic.twitter.com/FgO0SG8u81
— ANI (@ANI) April 18, 2018