भाजपाच्या बैठकीत गुलाबरावांचा निषेध जिल्हा बैठक: विकासाशी स्पर्धा करण्याचे आवाहन
By admin | Published: December 12, 2015 12:30 AM2015-12-12T00:30:58+5:302015-12-12T00:30:58+5:30
जळगाव : शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांच्या भूमिकेचा भाजपाच्या बैठकीत निषेधाचा ठराव करण्यात येऊन त्यांनी स्पर्धा करायचीच तर विकासाशी करावी असे आवाहन करण्यात आले.
Next
ज गाव : शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांच्या भूमिकेचा भाजपाच्या बैठकीत निषेधाचा ठराव करण्यात येऊन त्यांनी स्पर्धा करायचीच तर विकासाशी करावी असे आवाहन करण्यात आले. भाजपाची जिल्हा बैठक पक्षाच्या कार्यालयात झाली. जिल्हाध्यक्ष उदय वाघ, विभागीय संघटनमंत्री ॲड. किशोर काळकर, बेटी बचाव बेटी पढाव अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके, जिल्हा उपाध्यक्ष पी.सी. पाटील, गोविंद अग्रवाल, सुरेश धनके, हिरालाल चौधरी, देवयाची ठाकरे, प्रा. सुनील नेवे, जिल्हा सरचिटणीस डॉ. विजय धांडे, सदाशिव पाटील, अनंतराव कुलकर्णी, दीपक सुर्यवंशी, दीपक फालक, अमोल पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. बैठकीत प्रारंभी संघटनात्मक निवडणुका व तालुका कार्यकर्ता प्रशिक्षण वगाचा आढावा मंडळाच्या पदाधिकार्यांकडून घेण्यात आला. जिात भाजपाचे पाच लाखांच्या वर प्राथमिक सदस्य झाले असल्याचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी सांगितले. पक्ष जिल्ात मजबुत व भक्कम होत असून महसूल मंत्री एकनाथराव खडसे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली विविध योजना राबविल्या जात आहेत. या सर्व बाबींचा धसका घेऊन शिवसेना उपनेते आमदार गुलराबराव पाटील हे महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर बिनबुडाचे आरोप करीत आहेत. त्यांना स्पर्धा करायची असेल तर ती विकासाशी करावी असे आवाहन करून पाटील यांच्या भूमिकेच्या निषेधाचा ठराव करण्यात आला. ॲड. किशोेर काळकर यांची विभागीय संघटनमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल व उदय वाघ यांची उत्तर महाराष्ट्र निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. पक्षाचे जिल्ातील पदाधिकारी उपस्थित होते.