खडसेंच्या हीपणामुळे शेतकरी अडचणीत गुलाबराव पाटील : जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक तर मंत्र्यांचे सेवक
By admin | Published: May 13, 2016 10:35 PM2016-05-13T22:35:38+5:302016-05-13T22:35:38+5:30
जळगाव : जिल्हा बँकेकडून २०११ पासून पीक कर्जाचे पुनर्गठन केले जात आहे. मात्र पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्या हीपणामुळे पीक कर्जाचे पुनर्गठन होत नाही. मंत्र्यांमुळे शेतकर्यांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप आमदार गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकार्यांसोबत झालेल्या चर्चेवेळी केला. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी जनतेचे सेवक व्हावे मंत्र्यांचे सेवक नव्हे असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
Next
ज गाव : जिल्हा बँकेकडून २०११ पासून पीक कर्जाचे पुनर्गठन केले जात आहे. मात्र पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्या हीपणामुळे पीक कर्जाचे पुनर्गठन होत नाही. मंत्र्यांमुळे शेतकर्यांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप आमदार गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकार्यांसोबत झालेल्या चर्चेवेळी केला. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी जनतेचे सेवक व्हावे मंत्र्यांचे सेवक नव्हे असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.शिंगाडा मोर्चानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी आमदार गुलाबराव पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी जिल्हाधिकारी यांच्या दालनात गेले.एक लाखांचे कर्ज तीन लाखांचा करारजिल्हा बँक शेतकर्यांना एक लाखाचे कर्ज देत असताना तीन लाखांचा बोझा उतार्यावर बसवित असते. पीक कर्ज वाटप करीत असताना तलाठी, विकासो सचिव, क्षेत्र अधिकारी, कार्यकारी संचालक हे प्रकरणाची तपासणी करीत असतात. त्यानंतर संचालक मंडळ कर्जाला मान्यता देत असतात. धरणगाव तालुक्यातील २०० कोटींचे कर्ज बोगस होते तर संचालक असलेले एकनाथराव खडसे यांनी त्यावेळी डोळे लावले होते का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. गेल्या चार वर्षांपासून कर्जाचे पुनर्गठन केले जात आहे. मात्र मंत्र्यांसाठी शेतकर्यांना वेठीस धरण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.जिल्ाचे बॉस तुम्ही... मंत्र्यांच्या दबावात राहू नकाशेतकर्यांच्या प्रश्नावर जिल्हा बँकेच्या कार्यकारी संचालकांना फोन करावा तर ते फोन घेत नाहीत. भेटण्यासाठी गेलो तर दरोड्याचे गुन्हे दाखल करतात. जिल्ाचे बॉस म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो आहोत. तुम्ही जनतेचे सेवक आहात, मंत्र्यांच्या दबावात राहून त्यांचे सेवक होऊ नका असा सल्ला त्यांनी जिल्हाधिकार्यांना दिला. पालकमंत्र्यांचा कार्यक्रम असला की जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक हे मागे पुढे असतात. पालकमंत्र्यांचा सन्मान करा मात्र लक्षात येईल इतके दबावात राहू नका.जिल्हा प्रशासन मुक्ताईनगरच्या सेवेतमुक्ताईनगर तालुक्याच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सीईओ यांच्यासह सर्व अधिकार्यांची झाडून उपस्थिती होती. जिल्हा प्रशासन मुक्ताईनगर तालुक्याच्या सेवेत आहे का? असा सवाल जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी केला. चोर्या घरफोड्या वाढत आहे. गल्लोगल्ली सापेढ्या तयार झाल्या आहेत. पोलीस अधीक्षकांना गुन्हेगारी रोखण्यासाठी सूचना द्यावी अशी विनंती त्यांनी केली.