गुलाबराव पाटील यांची कारागृहात रवानगी न्यायालयीन कोठडी : जामीन अर्जावर आज निर्णय शक्य
By admin | Published: June 17, 2016 11:09 PM2016-06-17T23:09:24+5:302016-06-17T23:09:24+5:30
जळगाव: खोटा दस्ताऐवज तयार करून म्हसावद येथील पद्मालय शिक्षण प्रसारक संस्था हडपण्याचा प्रयत्न केल्याच्या दाखल गुन्ात शिवसेनेचे उपनेते आमदार गुलाबराव पाटील यांची शुक्रवारी कारागृहात रवानगी झाली. पोलीस कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी त्यांना सकाळी साडे अकरा वाजता न्यायालयात हजर केले असता न्या.एस.बी.देवरे यांनी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
Next
ज गाव: खोटा दस्ताऐवज तयार करून म्हसावद येथील पद्मालय शिक्षण प्रसारक संस्था हडपण्याचा प्रयत्न केल्याच्या दाखल गुन्ात शिवसेनेचे उपनेते आमदार गुलाबराव पाटील यांची शुक्रवारी कारागृहात रवानगी झाली. पोलीस कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी त्यांना सकाळी साडे अकरा वाजता न्यायालयात हजर केले असता न्या.एस.बी.देवरे यांनी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.एमआयडीसी पोलीस स्टेशनला दाखल गुन्ात जिल्हा न्यायालय व औरंगाबाद खंडपीठाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आमदार गुलाबराव पाटील गुरुवारी सकाळी अकरा वाजता न्यायालयाला शरण आले होते. शुक्रवारी सकाळी पोलिसांनी त्यांना न्यायालयात आणले असता न्या.देवरे यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. त्रयस्त अर्जदारांनी घेतली हरकत १)दुपारी अडीच वाजता त्रयस्त अर्जदार यशवंत कृष्णा पवार यांनी वकिलामार्फत गुलाबराव पाटील यांच्या जामीन अर्जावर हरकत घेतली. ॲड.पी.एन.पाटील यांनी युक्तीवादात जामिनाला विरोध करत संस्थेचे सभासद महारु बेलदार हे १८ ऑगस्ट १९९६ रोजी मयत असताना आरोपींनी २० एप्रिल २००८ रोजी झालेल्या बैठकीत त्यांना हजर दाखवून प्रोसेडींगवर सा दाखविल्या. बोगस दस्ताऐवज तयार करुन संस्था हडप केली. गुन्हा दाखल असतानाही पोलिसांनी लवकर दोषारोपपत्र दाखल केले नाही, त्यामुळे फिर्यादीला खंडपीठात दाद मागावी लागली, तेव्हा दोषारोपपत्र दाखल झाले. त्यावरुन पोलिसांवर दबाव किती होता हे सिध्द होते.२) खंडपीठाने अन्य पाच आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला, परंतु गुलाबराव पाटील यांना जामीन दिला नाही. पोलिसांनी त्यांना ४१ अ ची दोन वेळा नोटीस दिली, तरीही ते हजर झाले नाहीत. संस्थेचे अध्यक्ष हेच मास्टरमाईंड आहेत, असे सांगून त्यांच्या मागील गुन्ाची यादी त्यांनी न्यायालयात सादर केली. आम्ही कायद्याचा आदर करतो, असे आमदार सांगतात, तेच कायदा मोडतात हे कागदपत्रांवरुन दिसते, त्यामुळे ते कायद्याचा किती आदर करतात हे दिसते.३) पाटील यांचे वकील ए.के.देशमुख यांनी आमदार स्वत:हून न्यायालयात हजर झाले आहेत. पोलिसांनी हस्ताक्षर तपासणीसाठी कोठडी मागितली होती, तो तपासही पूर्ण झालेला आहे. तपासाधिकार्यांनीही अटी-शर्तीवर जामीन देण्यास हरकत नसल्याचा खुलासा दिलेला आहे. तसेच दोषारोप पत्र न्यायालयात आहे. खटला चालेल, त्यातून जो निकाल लागले तो आम्हाला मान्य असेल असे सांगून जामीन देण्याची विनंती केली. दोन्ही बाजूंचा तब्बल एक तास युक्तीवाद झाला. त्यावर शनिवारी निर्णय देण्याचे न्यायालयाने जाहीर केले.