चुकीचे वागाल तर सेनेचा आवाज दाखवू गुलाबराव पाटील : प्रशासकीय यंत्रणेला सज्जड दम; जळगावात जल्लोशात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2016 11:51 PM2016-07-09T23:51:31+5:302016-07-09T23:51:31+5:30

जळगाव : प्रशासन चांगले निर्णय घेत असेल तर मागे उभे राहूच पण जर चुकीचे कोणी वागत असेल तर शिवसेनेचा आवाज दाखवून देऊ असा सज्जड दम राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासकीय यंत्रणेला येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. कोणत्याही दडपणापेक्षा झालेले स्वागत, जल्लोशाने भारावून गेलो आहे. मी नव्हे हा शेतकरी मंत्री झाला असल्याचेचे भोवोद्गारही त्यांनी यावेळी काढले. रेल्वे स्थानकावर त्यांचे जल्लोशात स्वागत झाले.

Gulabrao Patil: Show the army's sound; Welcome to the Jalgaon shlokas | चुकीचे वागाल तर सेनेचा आवाज दाखवू गुलाबराव पाटील : प्रशासकीय यंत्रणेला सज्जड दम; जळगावात जल्लोशात स्वागत

चुकीचे वागाल तर सेनेचा आवाज दाखवू गुलाबराव पाटील : प्रशासकीय यंत्रणेला सज्जड दम; जळगावात जल्लोशात स्वागत

Next
गाव : प्रशासन चांगले निर्णय घेत असेल तर मागे उभे राहूच पण जर चुकीचे कोणी वागत असेल तर शिवसेनेचा आवाज दाखवून देऊ असा सज्जड दम राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासकीय यंत्रणेला येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. कोणत्याही दडपणापेक्षा झालेले स्वागत, जल्लोशाने भारावून गेलो आहे. मी नव्हे हा शेतकरी मंत्री झाला असल्याचेचे भोवोद्गारही त्यांनी यावेळी काढले. रेल्वे स्थानकावर त्यांचे जल्लोशात स्वागत झाले.
मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शनिवारी सकाळी राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रचंड जल्लोशात जळगाव रेल्वे स्टेशनवर स्वागत झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
खडसेंचे मंत्रीपद हा त्यांच्या पक्षाचा निर्णय
खडसेंचे मंत्रीपद गेले आणि मला संधी मिळाली असे नाही. त्यांच्या बाबतीतला निर्णय हा त्यांच्या पक्षाचा, ते या जिल्‘ाचे नेते आहेत. मला त्यांच्या सारखे १०, १२ खाते मिळणार नाहीत . पण मिळेल त्यात समाधान मानून संधीच सोन करेन. पोटात घुसून काम करू शकतो तसा वठणीवरही आणू शकतो. जे करायचे ते संधीच्या माध्यमातून करून दाखविल. राज्यमंत्री असलो, अधिकार कमी असले तरी काम करून दाखवेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
खडसेंचा विरोधक नाही
मी खडसेंचा विरोधक नव्हतो व नाही. जेथे धोरणे चुकली तेथे बोलत गेलो भविष्यातही बोलेल पण त्यामुळे त्यांचा विरोधक आहे, असे नाही, ते नेते आहेत. जेथे चुकेल ती चूक त्यांनी लक्षात आणून दिली मार्गदर्शन केले तर ते मान्यही करेल, असेही गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.
-----
मुख्यमंत्र्यांचा लाडका
हो, मी मुख्यमंत्र्यांचा लाडका आहे. विधानसभेत ज्या पद्धतीने भूमिका मांडतो त्याला दे दाद देतात व कौतुकही करतात, पण म्हणून संधी मिळाली असे नाही,असेही गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.
----

Web Title: Gulabrao Patil: Show the army's sound; Welcome to the Jalgaon shlokas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.