गुलाबराव पाटील यांच्या तैलचित्रास विरोध बाजार समितीमध्ये युतीत धूसफूस : सेना म्हणते, खडसेंचे तैलचित्र लावले, तसे गुलाबरावांचेही लावा, भाजपाचा विरोध

By admin | Published: December 9, 2015 11:54 PM2015-12-09T23:54:27+5:302015-12-09T23:54:27+5:30

जळगाव- कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आमदार गुलाबराव पाटील यांचे तैलचित्र लावण्यास भाजपाच्या संचालकांनी विरोध केला आहे. गुलाबराव यांचे तैलचित्र लावू नका, अशा सूचना भाजपाच्या वरिष्ठांकडून मिळाल्याची माहिती आहे.

Gulabrao Patil's opposition to the oil-marketing campaign: The army says that the oil tablets have been planted, so do Gulabarava Chowk, BJP opposition | गुलाबराव पाटील यांच्या तैलचित्रास विरोध बाजार समितीमध्ये युतीत धूसफूस : सेना म्हणते, खडसेंचे तैलचित्र लावले, तसे गुलाबरावांचेही लावा, भाजपाचा विरोध

गुलाबराव पाटील यांच्या तैलचित्रास विरोध बाजार समितीमध्ये युतीत धूसफूस : सेना म्हणते, खडसेंचे तैलचित्र लावले, तसे गुलाबरावांचेही लावा, भाजपाचा विरोध

Next
गाव- कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आमदार गुलाबराव पाटील यांचे तैलचित्र लावण्यास भाजपाच्या संचालकांनी विरोध केला आहे. गुलाबराव यांचे तैलचित्र लावू नका, अशा सूचना भाजपाच्या वरिष्ठांकडून मिळाल्याची माहिती आहे.
याच वेळी सभागृहात अलीकडेच महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांचे तैलचित्र जसे लावले तसे गुलाबराव पाटील यांचे तैलचित्र लावण्यासही कुणी विरोध करू नये... खडसेंच्या तैलचित्रास कुणीही विरोध केला नाही... आता गुलाबराव पाटील यांच्या तैलचित्रास विरोध का? असा प्रश्न शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे.
बाजार समितीमध्ये युतीची सत्ता आहे. भाजपाचे सभापती तर सेनेचे उपसभापती आहे. परंतु तैलचित्रांच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये दुही निर्माण झाली आहे.

आठ दिवसांपूर्वी लागले खडसेंचे तैलचित्र
सभागृहात खडसे यांचे तैलचित्र लावण्यासंबंधी मागील बैठकीत ठराव झाला. त्यानुसार त्यांचे तैलचित्र आठ दिवसांपूर्वी सभागृहात लावण्यात आले. मागील बैठकीतच गुलाबराव पाटील यांचे तैलचित्र सभागृहात लावण्यासंबंधी विषय चर्चेत आला.

सुरेशदादांचे तैलचित्र आहे... मग गुलाबराव यांचे कशाला हवे?
बाजार समितीच्या सभागृहात माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे तैलचित्र आहे. सुरेशदादा सेनेचे आहे. सेनेच्या एका नेत्याचे तैलचित्र असल्याने महसूलमंत्री खडसेंचे तैलचित्र लावण्यात आले. आता पुन्हा आणखी एक सेना नेत्याचे तैलचित्र सभागृहात लावण्याची गरज नाही, अशी भूमिका भाजपाच्या संचालकांनी घेतली आहे.
१२ डिसेंबरची बैठक गाजणार
गुलाबराव पाटील यांचे तैलचित्र लावण्याचा विषय १२ रोजीच्या बैठकीत घेतला आहे. त्यावर संचालकांना निर्णय घ्यायचा आहे. या विषयावरून वाद वाढत असल्याने बैठकीत तैलचित्र लावावे की नाही यावर मतदानदेखील होऊ शकते, अशी माहिती मिळाली.

कोट-
युतीमध्ये कुठलाही संघर्ष नाही. तैलचित्र लावण्याच्या विषयाला उगीचच वाढविणे अयोग्य वाटते. सर्व संचालक विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आहेत. आम्ही आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनात काम करतो. तैलचित्रांच्या मुद्द्यावर सर्व संचालक योग्य तो निर्णय घेतील.
-प्रकाश नारखेडे, सभापती, बाजार समिती

कोट-
आमदार गुलाबराव पाटील यांचे तैलचित्र लावण्याचा विषय १२ रोजीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यासंबंधी चर्चेत येईल. निर्णय काय होईल ते आताच सांगता येणार नाही. पण गुलाबराव पाटील यांच्या तैलचित्रासंबंधी कुणी विरोध करू नये.
-कैलास चौधरी, उपसभापती, बाजार समिती

Web Title: Gulabrao Patil's opposition to the oil-marketing campaign: The army says that the oil tablets have been planted, so do Gulabarava Chowk, BJP opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.