मंत्रीपदामुळे माझी अवस्था बांधून ठेवलेल्या पहिलवानासारखी गुलाबराव पाटलांची खंत : अजूनही मंत्री आहे असे वाटत नाही
By admin | Published: August 7, 2016 09:52 PM2016-08-07T21:52:36+5:302016-08-07T21:52:36+5:30
जळगाव : शिवसेनेतील ३० वर्षांची निष्ठा फळाला आली आणि आपल्याला मंत्रीपद मिळाले. मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच अधिवेशनात सहभाग घेतला. त्यावेळी सभागृहात बांधून ठेवलेल्या पहिलवानासारखे वाटत होते. अजूनही आपण मंत्री आहोत यावर विश्वास बसत नसल्याचे सांगत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक सेनेतर्फे जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात आयोजित सत्कार समारंभाप्रसंगी फटकेबाजी केली.
Next
ज गाव : शिवसेनेतील ३० वर्षांची निष्ठा फळाला आली आणि आपल्याला मंत्रीपद मिळाले. मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच अधिवेशनात सहभाग घेतला. त्यावेळी सभागृहात बांधून ठेवलेल्या पहिलवानासारखे वाटत होते. अजूनही आपण मंत्री आहोत यावर विश्वास बसत नसल्याचे सांगत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक सेनेतर्फे जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात आयोजित सत्कार समारंभाप्रसंगी फटकेबाजी केली.तर सभागृहाच्या चिंधडया उडविल्या असत्यासहकार राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच अधिवेशनात सहभागी झालो. मात्र सभागृहात करमत नव्हते. त्यातच अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचारावरून सभागृहात गोंधळ सुरु झाला. शासनाचा मंत्री असल्याने आपण गप्प होतो. त्यावेळी मी मंत्री नसतो तर सभागृहाच्या चिंधडया उडविल्या असत्या. मात्र आता गुलाबराव पाटील म्हणजे शासन आहे. आणि माझं सरकार हे चांगल आहे. माझ्या सरकारची प्रत्येक योजना ही चांगली आहे, असे म्हणावे लागत आहे.मंत्रीपदासाठी नाव निश्चित झाले आणि स्वत:ला चिमटा घेतलामंत्रीमंडळ विस्ताराचे वारे सुरु झाले. ज्या दिवशी नाव निश्चित झाले त्या दिवशी संध्याकाळी ६.२० वाजता परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा फोन आला. माझ्यासोबत माझे जालन्याचे मित्र होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली मुलाखत घेतली. तुमच्यावर गुन्हे आहेत. नुकतेच जेलमध्ये जाऊन आले, अशी विचारणा केली. वकिलांना बोलवून घेत संपूर्ण गुन्ह्यांबाबत शिवसेना पक्षप्रमुखांनी चर्चा केली. त्यानंतर रात्री ८.१५ वाजता मंत्रीपदासाठी नाव फायनल झाले. त्यानंतरही विश्वास बसत नसल्याने स्वत:लाचा चिमटा घेतला.