गुलबर्ग जळीतकांड : २४ दोषी, ३६ जणांची सुटका, ६ जून रोजी सुनावणार शिक्षा
By admin | Published: June 2, 2016 11:54 AM2016-06-02T11:54:16+5:302016-06-02T12:11:53+5:30
गुजरातमधील गुलबर्ग सोसायटी जळीतकांडप्रकरणाचा तब्बल १४ वर्षांनी निकाल लागला असून या जळीतकांडप्रकरणी अहमदाबाद न्यायालयाने २४ जणांना दोषी ठरवले असून ३६ जणांची सुटका केली
Next
>ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. ०२ - गुजरातमधील गुलबर्ग सोसायटी जळीतकांडप्रकरणाचा तब्बल १४ वर्षांनी निकाल लागला असून या जळीतकांडप्रकरणी अहमदाबाद न्यायालयाने २४ जणांना दोषी ठरवले असून ३६ जणांची सुटका केली आहे. गुरूवारी न्यायालयाने दिलेल्या निकालात ११ जणांवर हत्येच्या गुन्ह्यासह इतर आरोप लावण्यात आले आहेत. थोड्याच वेळात दोषींना शिक्षा सुनावण्यात येईल.
२००२ साली गुजरात दंगलीनंतर काँग्रेसचे नेते एहसान जाफरी हे राहत असलेल्या गुलबर्ग सोसायटीला आग लावण्यात आली होती. त्यात जाफरींसह ६९ जण मृत्यूमुखी पडले होते.
या प्रकरणी एहसान जाफरी यांच्या पत्नी जाकिया या गेल्या १४ वर्षआंपासून न्यायालयात लढा देत असून न्यायालयाच्या आजच्या निकालाने त्यांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. याप्रकरणी एसआयटीने ६६ जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यापैकी ९ आरोपी गेल्या १४ वर्षांपासून तुरूंगात असून इतर आरोपी जामीनावर बाहेर आहेत.