गुलबर्ग नरसंहार; ११ जणांना जन्मठेप

By Admin | Published: June 18, 2016 05:05 AM2016-06-18T05:05:05+5:302016-06-18T05:05:05+5:30

गुलबर्ग सोसायटी नरसंहार प्रकरण म्हणजे सभ्य समाजाच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस असल्याचे सांगत, विशेष एसआयटी न्यायालयाने या हत्याकांडातील २४ दोषींपैकी ११ जणांना

Gulberg massacre; Life imprisonment for 11 people | गुलबर्ग नरसंहार; ११ जणांना जन्मठेप

गुलबर्ग नरसंहार; ११ जणांना जन्मठेप

googlenewsNext

अहमदाबाद : गुलबर्ग सोसायटी नरसंहार प्रकरण म्हणजे सभ्य समाजाच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस असल्याचे सांगत, विशेष एसआयटी न्यायालयाने या हत्याकांडातील २४ दोषींपैकी ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. न्यायालयाने १२ आरोपींना सात वर्षे आणि एकाला दहा वर्षांची कैद दिली.
सर्व दोषींना मृत्युदंड देण्याची मागणी फेटाळताना न्यायालयाने सांगितले की, राज्य सरकारने १४ वर्षांच्या कारावासानंतर शिक्षेत सवलत देण्याच्या अधिकाराचा वापर न केल्यास ११ दोषींची जन्मठेप त्यांच्या मृत्यूपर्यंत कायम राहील. त्यांना १४ वर्षांनंतर त्यांना शिक्षेत सवलत देण्याच्या आपल्या अधिकाराचा वापर सरकारने करू नये, अशी विनंती आहे. या प्रकरणातील १३ अन्य आरोपींना सातएक मांगीलाल जैनला न्यायालयाने १० वर्षांचा कारावास दिला आहे. गेल्या २ जूनला न्यायालयाने हत्या व इतर गुन्ह्यांमध्ये ११ जणांना दोषी ठरविले होते, तर विहिंप नेता अतुल वैद्यसह अन्य १३ जणांवर कमी गंभीर आरोप ठेवले होते. या प्रकरणातील एकूण ६६ आरोपींपैकी ३६ लोकांची न्यायालयाने पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली होती.
खासदारासह ६९ लोकांना
जिवंत जाळले होते
अहमदाबादच्या गुलबर्ग सोसायटीत २८ फेब्रुवारी २००२ रोजी घडलेल्या या हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला होता. गोधरा कांडानंतर झालेल्या या हिंसाचारात काँग्रेसचे माजी खासदार अहसान जाफरी यांच्यासह ६९ लोकांना जिवंत जाळण्यात आले होते. त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. सर्वोच्च न्यायालयाने
गुजरात दंगलीतील नऊ प्रकरणांच्या तपासाकरिता विशेष चौकशी पथक स्थापन केले होते. त्यामध्ये गुलबर्ग सोसायटीचा समावेश होता. (वृत्तसंस्था)

मृत्युदंड का नाही?
यापूर्वी अशी घटना घडल्याची नोंद नाही. घटनेनंतर ९० टक्के आरोपी जामिनावर होते. त्या काळात त्यांच्याविरुद्ध कुठलीही तक्रार नव्हती वा अथवा त्यांनी कोणता गुन्हा केला नाही. त्यामुळे दोषींना फाशीची शिक्षा देणे आम्हाला योग्य वाटत नाही, असे न्या. पी. बी. देसाई यांनी स्पष्ट केले.

जन्मठेप : कैलाश धोबी, योगेंद्र शेखावत, जयेश जिंगार, कृष्णा कलाल, जयेश परमार, राजू तिवारी,भरत राजपूत, दिनेश शर्मा, नारायण टांक, लखनसिंग चुडासमा, भरत ताईली.

सात वर्षे शिक्षा : अतुल वैद्य, मुकेश जिंगर, प्रकाश पाढियार, सुरेंद्रसिंग चौहान, दिलीप परमार, बाबू मारवाडी, मनीष जैन, धर्मेश शुक्ला, कपिल मिश्रा, सुरेश धोबी, अंबेश जिंगर आणि संदीप पंजाबी.

Web Title: Gulberg massacre; Life imprisonment for 11 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.