धुळे पोलिसांविरुध्द गुप्तांनी केला मानहानीचा दावा दाखल

By admin | Published: December 9, 2015 11:56 PM2015-12-09T23:56:37+5:302015-12-09T23:56:37+5:30

जळगाव: विनाकारण व बेकायदेशीरपणे चौकशीसाठी ताब्यात घेऊन मोबाईल जप्त केल्याच्या प्रकरणात येथील माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धुळे पोलिसांविरुध्द पाच लाख रुपयांचा मानहानीचा दावा केला आहे. पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव, आझाद नगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक रमेशसिंग परदेशी व उपनिरीक्षक प्रेमनाथ ढोले यांच्याविरुध्द न्या.गंगापुरवाला व न्या.जाधव याद्वीपाठासमोरहा १५५२/२०१५ क्रमांकाने दावा दाखल आहे. धुळे येथील काही लोकप्रतिनिधींना अश्लिल संदेश केल्याच्या आरोपाखाली गुप्ता यांना गेल्या महिन्यात धुळे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यावेळी त्यांचा मोबाईलही जप्त करण्यात आला होता. त्यात काहीही निष्पन्न न झाल्याने पोलिसांनी त्यांना पुन्हा जळगावात आणून सोडले होते.

Gupta has filed a defamation suit against Dhule police | धुळे पोलिसांविरुध्द गुप्तांनी केला मानहानीचा दावा दाखल

धुळे पोलिसांविरुध्द गुप्तांनी केला मानहानीचा दावा दाखल

Next
गाव: विनाकारण व बेकायदेशीरपणे चौकशीसाठी ताब्यात घेऊन मोबाईल जप्त केल्याच्या प्रकरणात येथील माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धुळे पोलिसांविरुध्द पाच लाख रुपयांचा मानहानीचा दावा केला आहे. पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव, आझाद नगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक रमेशसिंग परदेशी व उपनिरीक्षक प्रेमनाथ ढोले यांच्याविरुध्द न्या.गंगापुरवाला व न्या.जाधव याद्वीपाठासमोरहा १५५२/२०१५ क्रमांकाने दावा दाखल आहे. धुळे येथील काही लोकप्रतिनिधींना अश्लिल संदेश केल्याच्या आरोपाखाली गुप्ता यांना गेल्या महिन्यात धुळे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यावेळी त्यांचा मोबाईलही जप्त करण्यात आला होता. त्यात काहीही निष्पन्न न झाल्याने पोलिसांनी त्यांना पुन्हा जळगावात आणून सोडले होते.

Web Title: Gupta has filed a defamation suit against Dhule police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.