धक्कादायक! कोरोनाच्या भीतीने घरात ३ वर्ष बंद, ७ वर्षाचा मुलगा १० वर्षांचा झाला, कचऱ्याचा ढीग लागला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 04:33 PM2023-02-23T16:33:38+5:302023-02-23T16:33:55+5:30
कोरोनाने जगाला दोन वर्ष संकटात टाकले. अनेक देशांनी कोरोनाच्या भीतीने लॉकडाऊन केले, भारतातही दोन वर्ष कोरोनाने चांगलाच कहर केला.
कोरोनाने जगाला दोन वर्ष संकटात टाकले. अनेक देशांनी कोरोनाच्या भीतीने लॉकडाऊन केले, भारतातही दोन वर्ष कोरोनाने चांगलाच कहर केला. कोरोनापासून वाचण्यासाठी अनेकांनी शहर सोडली. अनेकांनी घरातून बाहेर पडणे बंद केले. दोन वर्ष मास्कचाही वापर केला, अखेर कोरोनावर लस आली. भारतात सध्या कोरोना जवळजवळ संपला असूनही, हरियाणातील गुरुग्राम येथून समोर आलेल्या एका प्रकरणाने लोकांना आश्चर्यचकित केले आहे. मेट्रो सिटीमध्ये राहणारी महिला कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून आतापर्यंत तिच्या ७ वर्षाच्या मुलासह घरात कैद होती. पोलीस आणि आरोग्य विभागाच्या पथकाने त्यांची सुटका केली. आता मुलाचे वय १० वर्षे आहे.
हे प्रकरण गुरुग्राममधील आहे. शहरातील मारुती विहार कॉलनीत राहणाऱ्या ३५ वर्षीय एक महिलेने आपल्या मुलासह तीन वर्षांपासून स्वत:ला घरात कोंडून घेतले होते. त्यांना कोरोनाची भीती होती, आपल्या मुलाला कोरोनाची लागण होईल या भीतीने त्या घरातून बाहेर येत नव्हत्या. या भीतीने ही महिला २०२० पासून घराबाहेर पडलेल्या नाहीत, त्यांनी त्यांचा पत्नीलाही घरात घेतलेले नाही.
पती काही महिने आपल्या मित्राच्या घरी राहिला. यानंतर तो जवळच चक्करपूर भागात भाड्याने खोली घेऊन राहू लागला आणि नंतर पत्नी आणि मुलाशी व्हिडिओ कॉलवर बोलू लागला. यासोबतच पगार मिळाल्यानंतर तो दर महिन्याला पत्नीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करत होता.
घरात कैद असल्याने महिलेने भाजीपाला आणि घरगुती वस्तू ऑनलाइन ऑर्डर करण्यास सुरुवात केली. डिलिव्हरी बॉय गेटवरच पार्सल सोडायचा. कित्येकदा नवरा सामान आणून गेटवर ठेवायचा. नंतर पत्नी मास्क घालून साहित्या घ्यायच्या आणि सॅनिटाइज केल्यानंतर वापरायची. कचरा टाकण्यासाठी बाहेर जावे लागू नये म्हणून त्याने घरातच कचऱ्याचा ढीग ठेवला होता.
बाहेर जायला नको म्हणून महिलेने गॅस सिलिंडर मागवणेही बंद केले होते. सिलिंडर देणाऱ्यांकडून त्याला कोरोनाचा संसर्ग होईल, अशी भीती त्यांना होती. गेल्या तीन वर्षांपासून महिला इंडक्शन स्टोव्हवर जेवन बनवत होत्या. मुलाला ऑनलाइन क्लास सुरू केला. यासोबतच इंटरनेटच्या माध्यमातून शिकवण्याही दिल्या जात होत्या. पतीकडून पैसे मिळताच ती मुलाची फी भरायच्या.
शेजाऱ्याकडे बाळाला सोडून महिला पसार; 10 वर्षांनी परतली अन् मुलाची मागणी केली, मग...
भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या पतीने अनेक वेळा व्हिडीओ कॉलद्वारे समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती तयार झाली नाही. मुलाला कोविडची लस मिळाली तरच ती घराबाहेर पडेल, पण आता १० वर्षांच्या मुलांना लसीकरण होत नाही. तीन वर्षांनंतर, पतीने पोलीस ठाणे गाठले. एएसआय प्रवीण कुमार यांच्याकडे मदत मागितली. व्यवसायाने अभियंता असलेल्या पतीने पोलिसांना सर्व माहिती दिली.
महिला बालविकास आणि आरोग्य विभागाच्या महिला पथकासह पोलीस महिलेच्या घराजवळ गेले. पण कोणीही दरवाजा उघडला नाही. अपील केल्यावर, पत्नीने आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यानंतर काहीतरी अनुचित प्रकार घडण्याच्या भीतीने पोलीस परत गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पूर्ण नियोजनानुसार टीमने पुन्हा प्रयत्न केला, यानंतर महिलेने दरवाजा उघडला.
महिलेच्या मुलाने गेल्या तीन वर्षांत सूर्यही पाहिलेला नाही. कोविडच्या भीतीमुळे या तीन वर्षांत त्यांनी एलपीजीचा वापरही केला नाही. घटनास्थळावरून महिला आणि तिचा मुलगा बचावला आणि रुग्णालयात दाखल केले. डॉक्यरांनी त्या महिलेचे समुपदेशन केले पण अजुनही ती कोरोना संपल्याचे मानायला तयार नाही. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ही महिला मानसिक आजाराने ग्रस्त आहे. महिलेला उपचारासाठी पीजीआय रोहतक येथे पाठवण्यात आले.