गुर्जर आरक्षण आंदोलनाचे नेते किरोरी सिंह बैंसला यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 10:12 AM2022-03-31T10:12:47+5:302022-03-31T10:29:38+5:30

Kirori Singh Bainsla : किरोरी सिंह बैंसला हे भारतीय सैन्यात कर्नल म्हणून निवृत्त झाले आणि 2007 मध्ये राजस्थानमध्ये गुर्जर आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व केले.

gurjar leader kirori singh bainsla passes away at a jaipur hospital following prolonged illness | गुर्जर आरक्षण आंदोलनाचे नेते किरोरी सिंह बैंसला यांचे निधन

गुर्जर आरक्षण आंदोलनाचे नेते किरोरी सिंह बैंसला यांचे निधन

googlenewsNext

जयपूर : राजस्थानमधील गुर्जर आरक्षण आंदोलनाचे नेते कर्नल किरोरी सिंह बैंसला  (Gurjer leader col  Kirori Bainsla) यांचे गुरुवारी जयपूर येथील रुग्णालयात निधन झाले. गुर्जर आरक्षणामुळे देशात चर्चेत असलेले कर्नल किरोरी सिंह बैंसला हे अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर जयपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. 

राजस्थानमधील गुज्जर समाजाला सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली होती. किरोरी सिंह बैंसला हे भारतीय सैन्यात कर्नल म्हणून निवृत्त झाले आणि 2007 मध्ये राजस्थानमध्ये गुर्जर आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व केले. गुर्जर आरक्षण आंदोलनाबाबत कर्नल किरोरी सिंह बैंसला देशभर प्रसिद्ध झाले होते. कर्नल किरोरी सिंह बैंसला हे शेवटच्या श्वासापर्यंत या आरक्षणासाठी लढत राहिले. कर्नल किरोरी सिंह बैंसला यांच्या निधनाने गुर्जर समाजात शोककळा पसरली आहे.

कर्नल किरोरी सिंह बैंसला यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना केंद्रीय मंत्री कैलाश चौधरी यांनी ट्विट केले की, "कर्नल किरोरी सिंह बैंसला यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. समाजसुधारणा आणि समाज संघटित करण्यात तुमचे योगदान अविस्मरणीय असेल. याचबरोबर, आमदार जोगेंद्र सिंह अवाना यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, कर्नल किरोरी सिंह बैंसला यांच्या निधनाने गुज्जर समाजाचे आणि स्वतःचे वैयक्तिक नुकसान आहे. ते म्हणाले, 'आमचे गुर्जर गांधी गेले, गुजर समाजाचे यापेक्षा मोठे दु:ख असूच शकत नाही.'

कर्नल किरोरी सिंह बैंसला यांच्याशी संबंधित असलेले शैलेंद्र सिंह धाभाई यांनी गुज्जर समाजाचे हे कधीही भरून न येणारे नुकसान असल्याचे म्हटले. ते म्हणाले, 'मागासवर्गीय आणि गुर्जर समाजासाठी चैतन्य जागृत करण्याचे काम कर्नल किरोरी सिंह बैंसला यांनी केले. गुज्जर समाजाच्या कल्याणाची त्यांना नेहमीच काळजी असायची आणि ते अतिशय दृढनिश्चयी (व्यक्ती) होते.

Web Title: gurjar leader kirori singh bainsla passes away at a jaipur hospital following prolonged illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.