साध्वी बलात्कार प्रकरण : 5000 CCTV करणार गुरमीत राम रहीमचा भांडाफोड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 04:53 PM2017-09-13T16:53:37+5:302017-09-13T17:13:54+5:30

साध्वी बलात्कार प्रकरणी 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमबाबत दररोज नवनवीन गौप्यस्फोट केले जात आहे. बुधवारी डेरा सच्चा सौदाच्या आयटी प्रमुखाला ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेला व्यक्ती फरीदाबाद येथील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे.

gurmeet ram rahims dera it head arrest hard disk also seized | साध्वी बलात्कार प्रकरण : 5000 CCTV करणार गुरमीत राम रहीमचा भांडाफोड

साध्वी बलात्कार प्रकरण : 5000 CCTV करणार गुरमीत राम रहीमचा भांडाफोड

Next

नवी दिल्ली, दि. 13 -  साध्वी बलात्कार प्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमबाबत दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. बुधवारी डेरा सच्चा सौदाच्या आयटी प्रमुखाला ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेला व्यक्ती फरीदाबाद येथील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. यासोबतच डेरामधील 5000 सीसीटीव्हींचा रेकॉर्ड असलेली हार्ड डिस्कदेखील जप्त करण्यात आली आहे. यामध्ये बाबाची तुरुंगात रवानगी होण्यापूर्वीचा सर्व रेकॉर्ड कैद झालेला आहे.  ही हार्ड डिस्क डेरा मुख्यालयापासून दूरवर असलेल्या शेतातील शौचालयात आढळून आली. या हार्ड डिस्कमध्ये जवळपास 800 एकर  भूखंडवर पसरलेला डेरा आणि 91 एकर भूखंडावरील डेरा प्रमुख गुरमीत राम रहीमच्या महालचं सीसीटीव्ही रेकॉर्डींगदेखील आहे. दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेला आयटी हेडचा दुग्ध प्रकल्प आणि शाहपूर विद्युत गृहात आग लावण्यातही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. डेरा मुख्यालयात शोधमोहीमदेखील करण्यात आली. यानंतर अनेक धक्कादायक असे खुलासे समोर येऊ लागले आहेत.  

'शाळा-अनाथ आश्रमातील मुलींचा बलात्कार'
डेराचा पूर्वीचा अनुयायी गुरदास सिंह तूर यांनी असा आरोप केला आहे की, गुरमीत राम रहीम डेराच्या शाळा व अनाथ आश्रमातील मुलींवर बलात्कार करायचा. डेराच्याच हॉस्पिटलमध्ये या पीडित मुलींचा गर्भपातही केला जायचा. गुरदास यांनी सांगितले की, जेव्हा ते डेराचे सदस्य होते तेव्हा तीन गर्भवती मुलींचा त्यांच्यासमोर गर्भपात करण्यात आला.  शिवाय, बाबा राम रहीम ऑस्ट्रेलियातून सेक्सची औषधं मागवायचा, अशी माहितीही काही दिवसांपूर्वी समोर आली होती. 
 

मासिक पाळीचं कारण देऊन बाबाच्या तावडीतून सुटका करायच्या साध्वी
पूर्वी डेरातच राहणा-या एका साध्वीनं मंगळवारी (12 सप्टेंबर) एका टीव्ही चॅनेलसोबत केलेल्या बातचितदरम्यान असा गौप्यस्फोट केला आहे की, राम रहीम आवडत्या मुलींना रोज रात्री 11 वाजता आपल्या गुहेत बोलवायचा. पीडित मुलगीदेखील या गुहेत एके रात्री गेली होती, मात्र मासिक पाळीचं कारण देत कशीबशी राम रहीमच्या तावडीतून सुटका केल्याचं तिनं सांगितले. राम रहीमची शिकार होण्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी डेरातील साध्वी अनेकदा मासिक पाळीचं कारणं देऊन स्वतःची सुटका करत असत, असेही या साध्वीनं सांगितले आहे.  

बाबा राम रहीमसंदर्भातील 10 खळबळजनक खुलासे
1. कोर्टात न्यायाधिशांनी राम रहीमला बलात्काराबाबत विचारणा केली असता मी नपुंसक आहे, मी बलात्कार कसा करू शकतो असं राम रहीमकडून सांगण्यात आलं.      
2. राम रहीमची प्रकृती खराब होत आहे कारण ते सेक्स एडिक्ट आहेत असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. ते ऑस्ट्रेलियाहून सेक्ससाठी औषधं मागवायचे असा खुलासा एका रिपोर्टमधून झाला आहे.  
3. हनीप्रीत राम रहीमची दत्तक घेतलेली मुलगी आहे. मात्र, बलात्काराच्या आरोपात बाबा तुरूंगात गेल्यानंतर राम रहीमचे हनीप्रीत सोबतच जवळचे संबंध असल्याचा खुलासा झाला आहे.
5. राम रहीमवर  जवळपास 400 माणसांना नपुंसक बनवण्याचा आरोप लावण्यात आला आहे. याविरोधात राम रहीमविरोधात कोर्टात केस सुरू आहे. 
6. कोर्टाच्या आदेशानुसार डे-याची झाडाझडती घेतल्यानंतर अनेक खुलासे झाले आहेत. बाबाच्या डे-यात गर्भपात सेंटर देखील मिळालं आहे. 
7. या दरम्यान राम रहीमची गुहा देखील ब-याच चर्चेत राहिली. डे-यात अशाप्रकारचे अनेक सुरंग असून ते थेट बाबाच्या बेडरूमजवळ निघतात असाही खुलासा झाला आहे.  
8. राम रहीम आपल्या डे-यात स्वतःचं प्लॅस्टिकचं चलन वापरत होता. डे-यामध्ये प्लॅस्टिकचं चलन घ्यावं लागत होतं.  
9. राम रहीमला शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर कोर्टातून राम रहीमला पळवून नेण्याचा कट होता. दत्तक मुलगी हनीप्रीतसोबत तो पळून जाणार होता असाही खुलासा झाला आहे. याप्रकरणी पोलीस हनीप्रीतचा कसून शोध घेत आहेत.  
10. राम रहीमला शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसा झाली होती. हनीप्रीतकडे असलेली एक लाल बॅग म्हणजे हिंसा भडकावण्याचा इशारा होता असाही खुलासा आता झाला आहे.  
 

Web Title: gurmeet ram rahims dera it head arrest hard disk also seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.