अनधिकृत बांधकाम प्रकरणी मुख्यमंत्र्यावर टीकास्त्र हॉटेल गुरुदेव एनएक्स : कारवाई थांबवण्याचे दिले होते आदेश

By admin | Published: September 26, 2015 07:26 PM2015-09-26T19:26:37+5:302015-09-26T19:26:37+5:30

डोंबिवली : कल्याणच्या खडकपाडा येथील हॉटेल गुरुदेव एनएक्सने बांधलेल्या अनधिकृत शेडवरील कारवाईस आमदार गणपत गायकवाड यांनी हस्तक्षेप करून मुख्यमंत्री कार्यालयातून स्थगिती मिळविली होती. या संदर्भात पुन्हा चौकशीचे आदेश त्यानी दिले होते. त्यामुळे गुरूवारी ही कारवाई थांबविण्यात आली होती. परंतु, महापालिकेने सर्व कागदपत्रे मुख्यमंत्री कार्यालयाला सादर केली. त्यात हॉटेल मालकाने कारवाई करणे कसे टाळले, कारवाईपूर्वीचा चौकशीचा अहवाल, त्यासंदर्भात घेण्यात आलेली सुनावणी आदी सर्व सादर केले. त्यानुसार होत असलेली कारवाई योग्य असल्याची खात्री झाल्यावर त्यांनी पुन्हा कारवाई करण्याचे आदेश दिले. स्थगिती उठल्याची कुणकुण हॉटेल मालकाने स्वत:च शेड काढली. मात्र, या प्रकरणात मुख्यमंत्री कार्यालयाच्या बदलत्या भूमिकेवर सर्वत्र टीकेचा सूर उमटला आहे.

Gurudev NX vaccination hotel on orders of chief minister in unauthorized construction case: order to stop action | अनधिकृत बांधकाम प्रकरणी मुख्यमंत्र्यावर टीकास्त्र हॉटेल गुरुदेव एनएक्स : कारवाई थांबवण्याचे दिले होते आदेश

अनधिकृत बांधकाम प्रकरणी मुख्यमंत्र्यावर टीकास्त्र हॉटेल गुरुदेव एनएक्स : कारवाई थांबवण्याचे दिले होते आदेश

Next
ंबिवली : कल्याणच्या खडकपाडा येथील हॉटेल गुरुदेव एनएक्सने बांधलेल्या अनधिकृत शेडवरील कारवाईस आमदार गणपत गायकवाड यांनी हस्तक्षेप करून मुख्यमंत्री कार्यालयातून स्थगिती मिळविली होती. या संदर्भात पुन्हा चौकशीचे आदेश त्यानी दिले होते. त्यामुळे गुरूवारी ही कारवाई थांबविण्यात आली होती. परंतु, महापालिकेने सर्व कागदपत्रे मुख्यमंत्री कार्यालयाला सादर केली. त्यात हॉटेल मालकाने कारवाई करणे कसे टाळले, कारवाईपूर्वीचा चौकशीचा अहवाल, त्यासंदर्भात घेण्यात आलेली सुनावणी आदी सर्व सादर केले. त्यानुसार होत असलेली कारवाई योग्य असल्याची खात्री झाल्यावर त्यांनी पुन्हा कारवाई करण्याचे आदेश दिले. स्थगिती उठल्याची कुणकुण हॉटेल मालकाने स्वत:च शेड काढली. मात्र, या प्रकरणात मुख्यमंत्री कार्यालयाच्या बदलत्या भूमिकेवर सर्वत्र टीकेचा सूर उमटला आहे.
अनधिकृत बांधकामावरील कारवाई होण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने हा हस्तक्षेप का केला? संबंधित लोकप्रतिनिधी/आमदाराचा यात काय संबंध होता? याची चौकशी झाली पाहिजे असा सवाल नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. तसेच संबंधित मालकाने याआधीच शेड का काढली नाही, राजकीय दबावतंत्र का वापरले, मुळातच अनधिकृत शेड उभीच कशी केली? त्यास कोणाचे अभय होते याचीही सखोल चौकशी व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
-------------- ---------

मुख्यमंत्री कार्यालयातून स्टेची नोटीस दिली होती. ते सांगण्यासाठी मी तेथे गेलो होतो. शुक्रवारी स्टे उठल्यावर पुन्हा ती शेड तातडीने काढावी यासाठीही तेथे गेलो होतो. त्यात माझी भूमिका ही केवळ आमदार म्हणून होती. तसेच महापालिका व हॉटेल मालक यांच्यातील वादात तणाव झाल्याने तेथे जावे लागले. कारवाई होऊच नये असे मी कसे सांगू शकतो. - गणपत गायकवाड, आमदार

-----------------
उद्यान अतिक्रमणावर कारवाई कधी?
डोंबिवली : कल्याणच्या संतोषनगर येथील महापालिकेच्या एका उद्यानाच्या आरक्षित भूखंडावर अतिक्रमण झाले आहे. त्यासाठी गेल्या सहा महिन्यात १४ वेळा महापालिकेशी पत्रव्यवहार केला. परंतु, तरीही त्या ठिकाणी कारवाई का केली नाही असा सवाल आमदार गणपत गायकवाड यांनी केला. या संदर्भात आयुक्त ई.रवींद्रन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. त्यांनी भ्रमणध्वनी उचलला नाही.

Web Title: Gurudev NX vaccination hotel on orders of chief minister in unauthorized construction case: order to stop action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.