Uber'ने नोकरी दिली, काही महिने काम केले अन् १ कोटीला लावला चुना; असा झाला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 02:10 PM2023-02-01T14:10:03+5:302023-02-01T14:10:19+5:30
उबेरमध्ये एका कर्मचाऱ्याने मोठा घोटाळा केला आहे. या घोटाळ्यात या कर्मचाऱ्याने एक कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे, कंपनीला या घोटाळ्याची माहिती त्या कर्मचाऱ्याने राजीनामा दिल्यानंतर समजली.
उबेरमध्ये एका कर्मचाऱ्याने मोठा घोटाळा केला आहे. या घोटाळ्यात या कर्मचाऱ्याने एक कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे, कंपनीला या घोटाळ्याची माहिती त्या कर्मचाऱ्याने राजीनामा दिल्यानंतर समजली. उबेरने आता कर्मचाऱ्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. हा घोटाळा या कर्मचाऱ्याने २०२१ या वर्षी केला आहे.
कंपनीच्या एफआयआरनुसार, आरोपी कर्मचाऱ्यावर कंपनीशी संबंधित कॅब चालकांच्या बँक खात्यात पैसे पाठवण्याची जबाबदारी होती. यादरम्यान त्याने हुशारीने कंपनीच्या सर्व्हरशी छेडछाड करून बनावट ड्रायव्हरचे नंबर्स जोडले. बनावट कॅब चालकांची संख्या 388 होती.
यानंतर कर्मचाऱ्याने या बनावट चालकांना पैसे पाठवण्यास सुरुवात केल्याचा आरोप कंपनीने केला आहे. हळूहळू या आरोपने या ड्राइव्हरांना १.१७ कोटी रुपये पाठवले. सप्टेंबर २०२२ तक्रार केली आहे.
या तक्रारीत कंपनीने ३८८ बनावट चालकांपैकी ५४५ जणांना एकच फोन नंबर जोडलेला होता. पण, काही नावे वगळता त्यांची नावे वेगळी होती. या ३८८ चालकांना पाठवलेले पैसे केवळ १८ बँक खात्यांमध्ये जमा झाले. म्हणजेच एका बँक खात्यावर अनेक ड्रायव्हर्स लिंक झाले होते.
गुरुग्राम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कर्मचाऱ्याने हुशारीने पैसे काढले, त्यामुळे त्याचा घोटाळा कंपनीला पकडता आला नाही.
Uber च्या FIR नुसार, अनेक दिवस ही कथित फसवणूक केल्यानंतर आरोपीने डिसेंबर २०२१ ला कंपनीला राजीनामा दिला. कर्मचाऱ्याने कंपनी सोडल्यानंतर अनेक महिन्यांनी हा घोटाळा समोर आला. अधिकाऱ्यांच्या हे निदर्शनास आले.सध्या गुरुग्राम पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.