Car Accident News: झाडाला आदळून 2 कोटींची Porche कार स्वाहा..., लोक म्हणाले- 'याच्यापेक्षा Tata Nano बरी'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 08:46 PM2023-05-11T20:46:44+5:302023-05-11T20:47:26+5:30
Car Accident News: गुरुग्राममध्ये झालेल्या एका कार अपघाताचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
Porche Car Accident: गुरुग्राममध्ये आज(गुरुवारी) 2 कोटी रुपयांच्या आलिशान कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कार जळून खाक झाली. ही घटना गुरुवारी सकाळी गोल्फ कोर्स रोडवर घडली. या अपघाताचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून लोक या कारपेक्षआ टाटा नॅनो बरी, अशा प्रतिक्रिया देत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुग्राममध्ये या भरधाव वेगाने येणाऱ्या पोर्शे कारने झाडाला धडकून पेट घेतला. काही क्षणात कार जळून राख झाली. विशेष म्हणजे झाडाला धडकण्यापूर्वी कार दुभाजकालाही धडकली. घटनेनंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या कारची बातमी पाहून लोकांनी मजेशीर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. काही लोक मारुती तर काही टाटा नॅनोला पोर्शपेक्षा चांगले म्हणत आहेत.
Gurugram | A speeding luxury car caught fire & burned to ashes after hitting a tree at Golf Course road, in the early morning hours today. The car also collided with a divider before hitting a tree. The driver fled the spot, no one was injured in the incident pic.twitter.com/FG1ACXbdmB
— ANI (@ANI) May 11, 2023
समोर आलेल्या फोटोंमध्ये लाल रंगाची पोर्शे कार पूर्णपणे जळून गेल्याचे दिसत आहे. या लक्झरी स्पोर्ट्स कारची किंमत सुमारे 2 कोटी रुपये आहे. कार गोल्फ कोर्स रोडवरील सेक्टर 56 वरून येत होती आणि सिकंदरपूरकडे जात होती. कार सेक्टर 27 मध्ये दुभाजकाला धडकून सर्व्हिस लेनवर पडली आणि त्यानंतर झाडावर आदळून पेट घेतला.
लोकांच्या मजेशीर प्रतिक्रिया
या कारची अवस्था पाहून लोक आता सोशल मीडियावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एका व्यक्तीने लिहिले की, "या कारऐवजी देशाची शान मारुती असती तर प्रत्येकाने सुरक्षा मानकांचे ज्ञान पाजळले असते. पण पोर्शे असल्यामुळे कुणी काही बोलत नाही." दुसर्या यूजरने लिहिले, "लज्जास्पद, जर TATA असती तर एक ओरखडाही आला नसता!! उलट झाडच तुटून राख झाले असते." तिसर्या व्यक्तीने लिहिले की, "नॅनो असती तर काहीही झाले नसते."