"...तर ३ दिवसांत गुवाहाटी शहर कब्रस्तान बनून जाईल"; बद्रुद्दीन अजमल यांचे CM सरमा यांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2023 16:22 IST2023-11-04T16:20:31+5:302023-11-04T16:22:22+5:30
मियां मुस्लीमांच्या मुद्द्यावरून सरमा-अजमल यांच्यात शाब्दिक युद्ध

"...तर ३ दिवसांत गुवाहाटी शहर कब्रस्तान बनून जाईल"; बद्रुद्दीन अजमल यांचे CM सरमा यांना प्रत्युत्तर
Assam CM Himanta Biswa Sarma : आसामचेमुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि एआययूडीएफचे प्रमुख बद्रुद्दीन अजमल यांच्यात मिया मुस्लिमांबाबत शाब्दिक युद्ध सुरू आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, मला मियाँ मुस्लिमांकडून मतांची अपेक्षा नाही. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर बद्रुद्दीन अजमल यांनी उत्तर दिले आहे. प्रत्युत्तर देताना, एक गोष्ट न झाल्यास गुवाहाटी ३ दिवसात कब्रस्तान बनेल, असे एक विधान त्यांनी केले आहे.
मुख्यमंत्री सरमा काय म्हणाले होते?
मिया मुस्लिमांबाबत वक्तव्य करताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले होते की, 'जर आपण आपल्या राज्यातील मुस्लिमांबद्दल बोललो तर इथे आमचे संबंध फक्त मतांपुरते मर्यादित आहेत. कारण ते नंतर शाळा किंवा कॉलेजमध्ये पोहोचत नाहीत. आसाममधील मूळ मुस्लिमांच्या विकासावर आमचे लक्ष आहे. मला इतर मुस्लिमांकडून कधीच मतांची अपेक्षा नाही, मी आसामच्या मूळ मुस्लिमांकडून त्यांची अपेक्षा करतो. सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्येही मियां मुस्लिमांची संख्या आपल्या मूळ तरुणांपेक्षा जास्त आहे, हे अत्यंत खेदजनक आहे. आता मी या कॉलेजांमध्ये जाणे खूप बंद केले आहे.'
बदरुद्दीन अजमल यांचे प्रत्युत्तर
ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (AIUDF) प्रमुख बद्रुद्दीन अजमल यांनी हिमंता बिस्वा सरमा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि म्हणाले की, 'जर सर्व मियां मुस्लिमांनी आसामची राजधानी गुवाहाटीमध्ये काम करणं बंद केलं तर संपूर्ण शहर उजाड होऊन जाईल. जर आम्ही तीन दिवस काम केले नाही तर गुवाहाटी शहराचे कब्रस्तानात रूपांतर होऊन जाईल.