दुर्मिळ! 4 पायांच्या बाळाचा जन्म; दैवी चमत्कार समजून लोकांची मोठी गर्दी, डॉक्टर म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 01:29 PM2022-12-16T13:29:21+5:302022-12-16T13:40:30+5:30

महिलेने चार पाय असलेल्या मुलीला जन्म दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

gwalior omg news baby girl with four feet born at gwalior in madhya pradesh | दुर्मिळ! 4 पायांच्या बाळाचा जन्म; दैवी चमत्कार समजून लोकांची मोठी गर्दी, डॉक्टर म्हणाले...

दुर्मिळ! 4 पायांच्या बाळाचा जन्म; दैवी चमत्कार समजून लोकांची मोठी गर्दी, डॉक्टर म्हणाले...

googlenewsNext

मध्यप्रदेशमध्ये एक अजब घटना समोर आली आहे. महिलेने चार पाय असलेल्या मुलीला जन्म दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. डॉक्टरांनी चिमुकलीला अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. चार पायांच्या बाळाचा जन्म झाल्याची माहिती सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली. यानंतर महिलेच्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी बाळाला पाहण्यासाठी रुग्णालयात मोठी गर्दी केली आहे. तर, मे़डिकल भाषेत हे एक शारिरीक व्यंग असून त्याला इशियोपेगस असं म्हणतात, अशी माहिती चिमुकलीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार. ग्वाल्हेरच्या कमलराजा रुग्णालयात एका महिलेने चार पाय असलेल्या मुलीला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर वेगाने मुलीचे फोटो व्हायरल होत आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हे एक शारिरीक व्यंग आहे. वैज्ञानिक भाषेत याला इशियोपेगस असं म्हणतात. यामध्ये गर्भात वाढणाऱ्या अर्भकाच्या शरीराच्या खालच्या भागाचा अतिरिक्त विकास होत जातो. एक लाखातून एकाला असा आजार होतो. शस्त्रक्रिया करुन ही आपण शरिराचा अतिरिक्त भाग काढून टाकू शकतो, असं डॉक्टरांनी म्हटलं आहे.

चिमुकलीचे दोन पाय शस्त्रक्रिया करुन काढून टाकण्यात येणार आहे. मात्र, सध्या या मुलीच्या सर्व चाचण्या करण्यात येत असून ती पूर्णपणे सुदृढ आहे, असं रुग्णालयातून सांगण्यात येत आहे. ग्वालियअर येथील सिकंदर कंपू येथे राहणारी आरती कुशवाह हिने या मुलीला जन्म दिला आहे. आरतीला आधीही दोन मुली आहेत, अशी माहिती तिच्या बहिणीने दिली आहे. आता तिसरी मुलीचा जन्म चार पायांसोबत झाला आहे. त्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. 

आरतीच्या कटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. ती इतका खर्च करु शकत नाही. त्यामुळं तिचे कुटुंब सरकारकडून मदतीची मागणी करत आहेत. चार पायांच्या मुलीला पाहण्यासाठी लोकांनी रुग्णालयात गर्दी केली आहे. रुग्णालयातील दुसऱ्या रुग्णांचे कुटुंबीयही या मुलीला पाहण्यासाठी वॉर्डमध्ये आले आहेत. तर काही नागरिक या मुलीला चमत्कारी बोलत आहे तर काही जण तिला दैवी अवतार मानत आहे. सोशल मीडियावरही फोटो व्हायरल होत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: gwalior omg news baby girl with four feet born at gwalior in madhya pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.