‘ज्ञानवापी ही मंदिर किंवा मशीद नाही तर बौद्ध मठ’, बौद्ध धर्मगुरूंची सुप्रीम कोर्टात याचिका  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 05:34 PM2023-08-03T17:34:06+5:302023-08-03T17:35:49+5:30

Gyanvapi Case Update: ज्ञानवापी ही मशीद किंवा मंदिर नाही तर बौद्ध मठ आहे, असा दावा करत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्याने या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. 

'Gyanvapi is not a temple or a mosque but a Buddhist monastery', petition of Buddhist priests in the Supreme Court | ‘ज्ञानवापी ही मंदिर किंवा मशीद नाही तर बौद्ध मठ’, बौद्ध धर्मगुरूंची सुप्रीम कोर्टात याचिका  

‘ज्ञानवापी ही मंदिर किंवा मशीद नाही तर बौद्ध मठ’, बौद्ध धर्मगुरूंची सुप्रीम कोर्टात याचिका  

googlenewsNext

वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदी प्रकरणी सुनावणी करताना अलाहाबाद हायकोर्टाने आज महत्त्वाचा निर्णय दिला आहे. अलाहाबाद हायकोर्टाने एएसआयला ज्ञानवापी मशिदीमध्ये सर्वे करण्याची परवानगी दिली आहे. २१ जुलै रोजी वाराणसीमधील जिल्हा न्यायाधीशांनी ज्ञानवापी मशिदीच्या एएसआय सर्वेचे आदेश दिले होते. त्याविरोधात मुस्लिम पक्षाने सुप्रीम कोर्टात आणि नंतर सुप्रीम कोर्टाच्या सूचनेनुसार हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र आता हायकोर्टाने मुस्लीम पक्षाची याचिका फेटाळून लावली आहे. तसेच न्यायाच्या दृष्टीने एएसआयचा सर्वे होणे आवश्यक आहे, काही अटींसह हा सर्वे करणं आवश्यक असल्याचंही मत कोर्टानं मांडलं आहे. मात्र ज्ञानवापी ही मशीद किंवा मंदिर नाही तर बौद्ध मठ आहे, असा दावा करत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्याने या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. 

ज्ञानवापी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत बौद्ध धर्मगुरूंनी हा त्यांचा मठ असल्याचा दावा केला आहे. बौद्ध धर्मगुरूंनी सर्वोच्च न्यायालयामध्ये रीट याचिका दाखल करत ज्ञानवापी ही मंदिर किंवा मशीद नसून बौद्ध मठ असल्याचे म्हटले आहे. याबाबत बौद्ध धर्मगुरू सुमित रतन भंते यांनी केलेल्या दाव्यानुसार देशामध्ये अनेक अशी मंदिरं आहेतस जी बौद्ध मठ पाडून बांधण्यात आलेली आहेत. ज्ञानवापी मशिदीमध्ये आढळलेले त्रिशूळ आणि स्वस्तिक चिन्ह ही बौद्ध धर्माची आहेत. तसेच केदारनाथ किंवा ज्ञानवापीमध्ये ज्यांना ज्योतिर्लिंग असल्याचा दावा केला जात आहे ते बौद्ध स्तूप आहेत. ज्ञानवापी मशीद किंवा मंदिर नाही तर बौद्ध स्तूप आहे, असा दावा त्यांनी केला. 

सुमित रतन भंते यांनी देशभरामध्ये बौद्ध मठांचा शोध सुरू केला आहे. त्यांनी सांगितलं की, आम्ही नवा शोध सुरू केला आहे. त्यात जिथे जैन आणि बौद्ध मठांना तोडून मंदिर किंवा इतर धार्मिक स्थळे बांधण्यात आली आहेत, अशा स्थळांचा आम्ही शोध घेत आहोत. सर्व मंदिर आणि मशिदी त्यांच्या मूळ रूपात आल्या पाहिजेत. जिथे जिथे बौद्ध मठांचं स्वरूप बदलण्यात आलं आहे, तिथे बौद्ध मठ हे मूळ रूपात आणले पाहिजेत. बौद्ध धर्माच्या अनुयायांचही हेच मत आहे, असा दावा त्यांनी केला.

दरम्यान, आम्ही केदारनाथ, बद्रीनाथसह इतर मंदिरांबाबतही याचिका करणर आहोत, असेही त्यांनी सांगितले. सनातन बौद्ध धर्म सर्वात प्राचीन आहे, असाही दावा त्यांनी केला. तसेच एएसआयने ज्ञानवापीचा योग्य सर्व्हे केला तर बौद्ध मठच दिसून येईल. तसेच तसा तो आढळला तर ज्ञानवापी आमच्याकडे सोपवण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. 
 

Web Title: 'Gyanvapi is not a temple or a mosque but a Buddhist monastery', petition of Buddhist priests in the Supreme Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.