Gyanvapi Masjid Case: शुक्रवारच्या नमाजासाठी ज्ञानवापीत शेकडो लोकांची गर्दी, पोलिसांनी केले परत जाण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2022 01:39 PM2022-05-20T13:39:56+5:302022-05-20T13:41:05+5:30
Gyanvapi Masjid Case: अलाहाबाद उच्च न्यायालयाने ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली आहे. उन्हाळी सुट्टीनंतर 6 जुलै रोजी सुनावणी होणार.
Gyanvapi Masjid Case: वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याच्या दाव्यानंतर वझूखाना सील करण्यात आला असून, परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. दरम्यान, शुक्रवारच्या नमाजासाठी सरकारने केवळ मोजक्या लोकांना परवानगी दिली होती, पण आज अचानक शेकडोंच्या संख्येने लोक मशिदीच्या दिशेने आले. इतक्या मोठ्या संख्येने लोक आल्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. यावेळी पोलिसांनी अनेकांना परत जाण्याचे आवाहन केले.
Varanasi | Devotees gathered outside Gyanvapi mosque to offer Friday prayers
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 20, 2022
Earlier today, the masjid committee had appealed to the people to come to the mosque in small numbers due to the sealing of the 'Wazukhana' pic.twitter.com/2Z58tusOi1
पोलिसांनी लोकांना परतवले
पोलिसांनी मैदागीन चौकातूनच नमाजासाठी आलेल्या लोकांना परत जाण्यास सांगितले. तुम्ही तुमच्या घराजवळ किंवा परिसरातील मशिदीत नमाज अदा करा, असे पोलिसांनी नमाजींना आवाहन केले. याआधी गुरुवारी मशिदी व्यवस्थापनाने किमान लोकांना आवारात येण्याचे आवाहन केले होते. मात्र शुक्रवारच्या नमाजासाठी अचानक गर्दी वाढली. सध्या मशिदीच्या परिसरात बॅरिकेड्स लावण्यात आले असून, परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
वझूखान्यात जाण्यास बंदी
तत्पूर्वी, डीएम कौशल राज शर्मा यांनी मशीद समिती आणि मुस्लिम धर्मगुरूंसोबत बैठक घेतली. यात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. यासोबतच वझूमध्ये कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मशिदीमध्ये वूजूच्या पाण्याचे दोन ड्रम ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. डीएमच्या वतीने मस्जिद कमिटीला नोटीस बजावण्यात आली आहे, ज्यामध्ये कोणीही सीलबंद परिसरात जाण्याचा प्रयत्न करू नये किंवा परिसर सील करण्यासाठी लावलेल्या नऊ कुलूपांमध्ये छेडछाड करू नये, असे म्हटले आहे.
Allahabad High Court adjourns the hearing in the Kashi-Vishwanath temple-Gyanvapi Mosque issue of Varanasi till 6th July
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 20, 2022
अलाहाबाद उच्च न्यायालयाने ज्ञानवापी प्रकरण पुढे ढकलले
अलाहाबाद उच्च न्यायालयात ज्ञानवापी प्रकरणावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर या प्रकरणावर 6 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. 31 वर्षांपूर्वी 1991 मध्ये दाखल झालेल्या खटल्याची सुनावणी करता येईल की नाही, याचा निर्णय उच्च न्यायालयाने घ्यायचा आहे. या प्रकरणी शेवटची सुनावणी 16 मे रोजी झाली होती. गेल्या सुनावणीत हिंदू पक्षाचा युक्तिवाद पूर्ण होऊ शकला नाही. ती पूर्ण झाल्यानंतर मुस्लिम पक्ष आपले युक्तिवाद मांडतील.