Gyanvapi Masjid Survey : औरंगजेबाच्या सांप्रदायिक क्रूरतेकडे दुर्लक्ष करता येणार नाही; ज्ञानवापी सर्व्हे वादावर मुख्तार अब्बास नक्वींची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2022 03:40 PM2022-05-08T15:40:11+5:302022-05-08T16:50:21+5:30
न्यायालयाच्या निर्णयावर टिप्पणी करणे योग्य नाही. हा कोट्यवधी जनतेच्या आस्थेशी संबंधित मुद्दा आहे, असे नक्वी यांनी म्हटले आहे....
ज्ञानवापी मशिदीशी संबंधित सर्व्हे वादावर भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. न्यायालयाच्या निर्णयावर टिप्पणी करणे योग्य नाही. हा कोट्यवधी जनतेच्या आस्थेशी संबंधित मुद्दा आहे. या मुद्द्यावर, औरंगजेबाकडून करण्यात आलेल्या सांप्रदायिक क्रूरतेकडे दूर्लक्ष करता येणार नाही, असे मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले आहे.
औरंगजेबाच्या कृत्याचे समर्थन केले जाऊ शकत नाही -
वाराणसीतील काशी विश्वनाथ आणि ज्ञानवापी मशीद परिसरात सर्व्हे करण्यावरून वाद सुरू झाला आहे. जेव्हापासून सर्व्हेच्या कारवाईला सुरुवात झाली आहे, तेव्हापासूनच निदर्शनेही सुरू झाली आहेत. ही कारवाई म्हणजे कायद्याचे उल्लंघण करणारी असल्याचे AIMIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी म्हटले आहे. तर अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी (Mukhtar Abbas Naqvi) यांनी, कुणीही औरंजगजेबाने केलेल्या कृत्याचे समर्थन करू शकत नाही, असे म्हटले आहे.
औरंगजेब के "क्रूरता के कमुनल क्राइम की काली करतूत" इतिहास की हकीक़त है, हकीक़त पर हाहाकार नहीं स्वीकार ही समझदारी है ।🙏
— Mukhtar Abbas Naqvi (@naqvimukhtar) May 7, 2022
ज्ञानवापीच्या 'सर्व्हे'वरून वाद -
अद्याप सर्व्हे पूर्ण झालेला नाही. ज्ञानवापी मशिदीत दुसऱ्या दिवशी सर्व्हे होऊ शकला नाही. कारण कोर्ट कमिश्नर यांना आत जाण्यापासून रोखण्यात आले. आणखी एका मुस्लीम पक्षाने कोर्ट कमिश्नर यांना हटविण्याची मागणी केली. तर दुसऱ्या बाजुला, यासंदर्भात झालेल्या भडकाऊ घोषणाबाजीवरून एकाला अटक करण्यात आली आहे. आता या सर्व्हे प्रकरणावर 9 मे रोजी पुढील सुनावणी होईल.