ज्ञानवापी प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय; हिंदू पक्षाला मिळाला पूजा करण्याचा अधिकार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 03:57 PM2024-01-31T15:57:50+5:302024-01-31T15:58:13+5:30
ज्ञानवापी प्रकरणात कोर्टाने हिंदू पक्षाला ज्ञानवापीच्या व्यास तळघरात नियमित पुजेचा अधिकार दिला आहे.
Gyanwapi News: मागील अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या वाराणसीतील ज्ञानवापी प्रकरणात बुधवारी जिल्हा न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे. वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयात मंगळवारी हिंदू आणि मुस्लिम पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला. आज अखेर ज्ञानवापी संकुलात असलेल्या व्यासांच्या तळघरात पूजा करण्याचा अधिकार हिंदू पक्षाला मिळाला आहे.
#WATCH | Gyanvapi case | UP: Advocate of the Hindu side, Sudhir Tripathi says, "...Today the court has ordered that arrangements should be made and puja here (Vyas ji Ka Tekhana) should be allowed. The puja can start on any day in the next 7 days..." pic.twitter.com/bcTIAiDgRi
— ANI (@ANI) January 31, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानवापी मशिदीमध्ये एक तळघर आहे, ज्यामध्ये सोमनाथ व्यास देवाच्या मूर्तीची पूजा करायचे. आता विश्वनाथ मंदिरातील पुजाऱ्यांनी इथे पूजा करावी आणि बॅरिकेड्स हटवण्याची व्यवस्था करावी, असे जिल्हा न्यायाधीशांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. सोमनाथ व्यास यांचे नातू शैलेंद्र पाठक यांनी तळघरात पुजेची परवानगी मागितली होती. 17 जानेवारी रोजी जिल्हा प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशाने व्यासांच्या तळघराचा ताबा घेतला होता. एएसआयच्या सर्वेक्षणाच्या कारवाईदरम्यान हे तळघर स्वच्छही करण्यात आले.
#WATCH | UP | Gyanvapi case | Advocate Vishnu Shankar Jain, representing the Hindu side says, "We will file a caveat in the Allahabad HC..." pic.twitter.com/qcOKtYWj4B
— ANI (@ANI) January 31, 2024
न्यायालयाने आदेशात काय म्हटले?
वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांनी म्हटले की, व्यासांच्या तळघराचा ताबा वाराणसीचा जिल्हा दंडाधिकाऱ्याकडे आला आहे, त्यामुळेच विश्वनाथ मंदिराचे पुजारी ते तळघर स्वच्छ करुन तिथे नियमित पूजा करतील. तिथे लावलेले बॅरिकेडिंगहीं हटवण्याचे निर्देश दिले आहेत. वाराणसी न्यायालयाने सोमनाथ व्यास यांच्या कुटुंबीयांना या पूजेचा अधिकार दिला
तळघरातील पूजा 1993 मध्ये बंद करण्यात आली
ज्ञानवापी मशिदीमध्ये एक तळघर आहे, ज्यामध्ये सोमनाथ व्यास देवतेच्या मूर्तीची पूजा करत असत. डिसेंबर 1993 मध्ये राज्याच्या तत्कालिन मुलायम सिंह यादव सरकारच्या तोंडी आदेशानुसार, तळघर सील करण्यात आले आणि तळघरात पुजा करण्यास मनाई करण्यात आली. नंतर तिथे बॅरिकेड लावण्यात आले. तळघर 1993 पासून बंद होते आणि तळघराची चावी वाराणसीच्या जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे संरक्षक म्हणून ठेवण्यात आली होती. 2016 मध्ये सोमनाथ व्यास यांचे नातू शैलेंद्र पाठक यांनी वाराणसी न्यायालयात याचिका दाखल करून त्यांची मालमत्ता परत करण्याची मागणी केली होती.