ज्ञानवापी सर्व्हे: 'मंदिराचे अवशेष, शेषनाग-कमळाची कलाकृती', मिश्रा यांनी न्यायालात सादर केला अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 09:42 AM2022-05-19T09:42:28+5:302022-05-19T13:17:57+5:30
Kashi Vishwanath Gyanvapi Survey : अजय मिश्रा यांनी 6 मे आणि 7 मे रोजी केलेल्या सर्व्हेचा अहवाल न्यायालयात सादर केला आहे. त्यावेळी ते एकटेच कोर्ट कमिश्नर होते. यावेळी व्हिडिओग्राफीही करण्यात आली होती. हा डेटाही न्यायालयात सादर करण्यात आला आहे.
माजी एडव्होकेट कमिश्नर अजय मिश्रा यांनी वाराणसीन्यायालयात ज्ञानवापी मशिदीचा सर्व्हे अहवाल सादर केला आहे. यात, ज्ञानवापी परिसरात उत्तर ते पश्चिम भिंतीच्या कोपऱ्यात जुन्या मंदिरांचे अवशेष सापडले आहेत. ज्यावर देवी-देवतांच्या कलाकृती आहेत. याशिवाय, उत्तरेपासून पश्चिमेकडे चालताना मध्यभागी शेषनागाची कलाकृती आणि नागाच्या फन्यासारख्या आकृत्याही दिसून आल्या आहेत. असा दावा अजय मिश्रा यांनी आपल्या सर्व्हे अहवालात केल्याचे सांगण्यात येत आहे.
अॅडव्होकेट कमिश्नर अजय मिश्रा यांनी वाराणसीन्यायालयाच्या आदेशानंतर 6 ने आणि 7 मे रोजी ज्ञानवापी मशिदीचा सर्व्हे केला होता. मात्र, या सर्व्हेला विरोध झाल्यानंतर त्यांना हा सर्व्हे थांबवावा लागला होता. यानंतर, मुस्लीम पक्षाकडून न्यायालयाकडे अॅडव्होकेड कमिश्नर मिश्रा यांना हटविण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने मिस्लीम पक्षाची मागणी फेटाळली होती. याशिवाय, विशाल सिंह आणि अजय सिंह यांनाही कोर्ट कमिश्नर म्हणून नियुक्त करण्यात आले होते. न्यायालयाने 17 मेपर्यंत ज्ञानवापी मशिदीत सर्व्हेकरून अहवाल सादर करण्याचे आदेशदिले होते.
अजय मिश्रा यांनी अहवालात केले असे दावे -
अजय मिश्रा यांनी 6 मे आणि 7 मे रोजी केलेल्या सर्व्हेचा अहवाल न्यायालयात सादर केला आहे. त्यावेळी ते एकटेच कोर्ट कमिश्नर होते. यावेळी व्हिडिओग्राफीही करण्यात आली होती. हा डेटाही न्यायालयात सादर करण्यात आला आहे. या अहवालात मिश्रा यांनी काही नवीन गोष्टींचा उल्लेख केला आहे.
- अहवालानुसार, 6 मे रोजी बॅरिकेडिंगबाहेर उत्तरते पश्चिम असलेल्या भिंतीच्या कोपऱ्यावर जुन्या मंदिरांचे अवशेष आढळून आले. यावर देवी-देवतांच्या कलाकृती आढळून आल्या आहेत. तर काही कमळाच्या कलाकृतीही आढळून आल्या आहेत.
- दगडांच्या आतल्या बाजूला काही कमळाच्या आणि इतर आकृत्या असल्याचे स्पष्टपणे दिसत होते.
- उत्तर-पश्चिम कोपऱ्यात गिट्टी सिमेन्टच्या सहाय्याने चबूतऱ्यावर नवे काम दिसते. वरील सर्व आकृत्यांची व्हिडिओग्राफी करण्यात आली आहे.
- उत्तरेकडून पश्चिमेकडे जाताना मध्यभागी दगडावर शेषनागाची आकृती, नागफना सारख्या आकृत्या तिसून आल्या आहेत. शिलेवर शेदऱ्या रंगाच्या नक्षीदार कलाकृतीही दिसून आल्या आहेत.
- एका शिलेवर देव विग्रह, ज्यामत चार मूर्तींचा आकार दिसतो, यावर शेंदूर लावलेला आहे. चौथी आकृती, जी मूर्तीसारखी दिसते, त्यावरही शेंदूर लावण्यात आलेला आहे.
- सर्व शिला दीर्घकाळापासूनच जमिनीवर पडून असल्याचे दिसत आहेत. हे एखाद्या मोठ्या इमारतीचे भग्न अवशेषांसारखे दिसतात. असे अनेक दावे मित्रा यांनी आपल्या अहवालात केले आहेत.