ज्ञानवापीचे तळघर उघडताच सापडले पुरावे, एएसआयच्या पथकाने व्हिडीओग्राफी केली; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 08:40 AM2023-08-06T08:40:30+5:302023-08-06T08:41:11+5:30

गेल्या काही दिवसापासून ज्ञानवापीचे सर्वक्षण सुरू आहे.

Gyanvapi Survey Update Evidence found on opening of Gyanvapi's basement videographed by ASI team; Read in detail | ज्ञानवापीचे तळघर उघडताच सापडले पुरावे, एएसआयच्या पथकाने व्हिडीओग्राफी केली; वाचा सविस्तर

ज्ञानवापीचे तळघर उघडताच सापडले पुरावे, एएसआयच्या पथकाने व्हिडीओग्राफी केली; वाचा सविस्तर

googlenewsNext

गेल्या काही दिवसापासून ज्ञापवापी संदर्भात वाद सुरू आहे, आता कोर्टाने सर्वक्षण करण्यास परवानगी दिली आहे. ज्ञानवापी सर्वेक्षणाचा आज तिसरा दिवस असून, त्याचे काम सकाळी ९ वाजल्यापासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी शनिवारी वुजुखाना स्थळ म्हणजेच वाद असलेली जागा वगळता संपूर्ण ज्ञानवापी परिसराचे सर्वेक्षण करण्यात आले. चिन्हांची तपासणी करण्यात आली आणि व्हिडिओग्राफीपासून फोटोग्राफीपर्यंत सर्व काही करण्यात आले. यासोबतच आवारात असलेल्या तीन तळघरांपैकी एका तळघराचे कुलूप उघडण्यात आले. 

पासपोर्ट अर्ज प्रक्रियेसाठी नवा नियम, आता DigiLocker वर अपलोड करावे लागतील डॉक्युमेंट, जाणून घ्या, कसे वापरायचे? 

ज्ञानवापी कॅम्पसचे ASI सर्वेक्षण उच्च सुरक्षेदरम्यान केले जात आहे. एएसआयच्या पथकाने आतापर्यंत दोन दिवस सर्वेक्षण केले आहे. दुसऱ्या दिवशी एएसआयच्या सर्वेक्षणादरम्यान ज्ञानवापी मशिदीच्या खाली तळघर उघडण्यात आले तेव्हा एक महत्त्वाचा टप्पा गाठला. मुस्लिम पक्षाच्या बाजूने तळघराची चावी एएसआयकडे सोपवली, त्यानंतर तळघर उघडण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळघराचा दरवाजा उघडला असता, तळघराच्या दरवाजापासून २ फूट अंतरावर ३ फूट उंचीवर फुलाचा आकार दिसला. येथे ५-६ फुलांचे आकार दाखविण्यात आले असून, त्यांचे छायाचित्रण व व्हिडिओग्राफी करण्यात आली आहे.

एएसआय टीमने तळघरातील ८-८ फूट उंचीच्या ४ खांबांचे सर्वेक्षण केले आहे. खांबांच्या सर्वेक्षणादरम्यान त्यांच्यावर बेल, कलश, फुलांचा आकार दिसून आला आहे. तळघरात प्राचीन हिंदी भाषेत काहीतरी लिहिलेले दिसते. एएसआयच्या पथकाने या हस्ताक्षराचा विशेष तपास सुरू केला आहे.

आजही होणार सर्वेक्षण

गेल्या वर्षी ज्या ठिकाणी कथित शिवलिंग सापडले होते, त्या ज्ञानवापी येथील मशिदीचा भाग सील करण्यात आला आहे. एएसआयला तेथे सर्वेक्षण करण्याची परवानगी मिळालेली नाही. वुजू खानाचा भाग वगळता संपूर्ण मशिदीच्या प्रत्येक भागाचे सर्वेक्षण केले जात आहे. 

एएसआयने ज्ञानवापी मशिदीच्या मुख्य घुमटाच्या आतील बाजूचे सर्वेक्षण केले जे दृश्यमान आहे.

ज्या मशिदीत नमाज अदा केली जाते तेथेही सर्वेक्षण करण्यात आले.

मशिदीच्या पश्चिमेकडील भिंतीचेही सर्वेक्षण करण्यात आले.

ज्ञानवापी तळघर उघडून सर्वेक्षण केले.

याशिवाय एएसआयने मशिदीच्या अनेक भिंतींचेही सर्वेक्षण केले. तिथे व्हिडीओ बनवले आणि फोटोग्राफीही केली.

सर्वेक्षणाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी मुस्लीम पक्षानेही सर्वेक्षणात सहभाग घेतला. व्यवस्था समितीच्या वतीने मुस्लिम पक्षाचे वकील मुमताज अहमद यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मातीचे नमुने आणि दगडाचे तुकडे घेण्याची परवानगी नाही. त्यामुळे आतापर्यंत केलेल्या सर्वेक्षणात एएसआयने तेथे सापडलेल्या गोष्टींची यादी तयार केली आहे.

सर्वेक्षणासाठी ज्ञानवापी परिसराची चार भागांमध्ये विभागणी करण्यात आली असून तेथे सर्वत्र कॅमेरे लावून व्हिडिओग्राफी केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्ञानवापी येथे मशिदीखाली एकच तळघर नाही. त्याऐवजी, एकूण ३ तळघर आहेत त्यापैकी फक्त १ तळघर आता उघडले आहे. 

Web Title: Gyanvapi Survey Update Evidence found on opening of Gyanvapi's basement videographed by ASI team; Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.