‘एच-१ बी’ व्हिसा धोरणात बदल नाही! इमिग्रेशन सेवा विभागाचा लाखो भारतीयांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 06:21 AM2018-01-10T06:21:05+5:302018-01-10T06:21:20+5:30

अनिवासी भारतीयांना दिल्या जाणा-या ‘एच-१ बी’ व्हिसाच्या नियमावलीत कुठलाही बदल केला जाणार नाही, असे अमेरिकेकडृून स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या लाखो भारतीयांना दिलासा मिळाला आहे.

'H-1B' visa policy does not change! Relief for millions of Indians in immigration service department | ‘एच-१ बी’ व्हिसा धोरणात बदल नाही! इमिग्रेशन सेवा विभागाचा लाखो भारतीयांना दिलासा

‘एच-१ बी’ व्हिसा धोरणात बदल नाही! इमिग्रेशन सेवा विभागाचा लाखो भारतीयांना दिलासा

Next

नवी दिल्ली : अनिवासी भारतीयांना दिल्या जाणा-या ‘एच-१ बी’ व्हिसाच्या नियमावलीत कुठलाही बदल केला जाणार नाही, असे अमेरिकेकडृून स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या लाखो भारतीयांना दिलासा मिळाला आहे.
अमेरिकन कंपन्यांमध्ये तीन ते सहा वर्षांपर्यंत नोकरीसाठी जाणा-या भारतीयांसह अन्य देशांमधील कर्मचाºयांना ‘एच-१ बी’ व्हिसा मिळतो. असे परदेशी लोक तेथील नागरिकत्वाच्या ‘ग्रीन कार्ड’साठी अर्ज करू शकतात. मात्र अमेरिकेकडून या व्हिसाधारकांना मुदतवाढ दिली जाणार नसल्याची चर्चा होती. त्यामुळे लाखो भारतीयांना परतावे लागले असते. त्या चर्चेवर अमेरिकेच्या सिटिझनशिप व इमिग्रेशन सेवा विभागाने (यूएससीआयसी) स्पष्टीकरण दिल्याने अनेक भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
‘एच-१ बी’ व्हिसाधारकांना मुदतवाढ न देण्याचा कुठलाही निर्णय अमेरिकेने घेतलेला नाही. सर्व व्हिसाधारकांसाठी नियमानुसार दिली जाणारी वास्तव्याची मुदत कायम असेल, असे यृएससीआयसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनीही अमेरिकेच्या वाणिज्य सचिवांसोबतच्या बैठकीत हा विषय उचलला होता. त्यानंतर आता यूएससीआयसीने दिलेल्या स्पष्टीकरणामुळे सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.

लोकप्रतिनिधींचा होता विरोध
अमेरिकेत सध्या ५ लाख भारतीय वास्तव्यास आहेत. त्यातील हजारो भारतीय हे ‘एच-१ बी’ व्हिसावर कार्यरत आहेत. मुदतवाढ न मिळाण्यासंबंधी नवीन वर्षाच्या सुरुवातीला आलेल्या वृत्तामुळे अशा सर्वांवर नोकरी सोडून भारतात परतण्याची टांगती तलवार होती. अमेरिकेच्या या संभाव्य निर्णयावर नॅसकॉम या आयटी उद्योजकांच्या संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अमेरिकेतील लोकप्रतिनिधींनीही या बदलास विरोध दर्शविला होता.

Web Title: 'H-1B' visa policy does not change! Relief for millions of Indians in immigration service department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.