चिंताजनक! कोरोनानंतर H3N2 व्हायरसचा कहर; देशात 6 जणांनी गमावला जीव; तज्ञ म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 01:10 PM2023-03-10T13:10:12+5:302023-03-10T13:13:01+5:30

H3N2 Virus : H3N2 इन्फ्लूएंझाच्या उद्रेकाने देशभरात चिंता वाढवली आहे.

h3n2 virus india one death in karnataka and 6 death in all over india | चिंताजनक! कोरोनानंतर H3N2 व्हायरसचा कहर; देशात 6 जणांनी गमावला जीव; तज्ञ म्हणतात...

चिंताजनक! कोरोनानंतर H3N2 व्हायरसचा कहर; देशात 6 जणांनी गमावला जीव; तज्ञ म्हणतात...

googlenewsNext

कोरोनानंतर आता H3N2 व्हायरस (इन्फ्लूएंझा व्हायरस) पसरू लागला आहे. H3N2 व्हायरस मुळे देशात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक, पंजाब आणि हरियाणामध्ये H3N2 व्हायरस मुळे मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. मात्र, प्राथमिक तपासात ही बाब समोर आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तथापि, H3N2 मुळे मृत्यूचे कारण निश्चित करण्यासाठी अधिक तपास करणे आवश्यक आहे.

दुसरीकडे, कर्नाटकातील हसनमध्ये H3N2 व्हायरस मुळे एका व्यक्तीच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. एच गौडा असे मृत रुग्णाचे नाव आहे. ते 82 वर्षांचे होते. 24 फेब्रुवारी रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 1 मार्च रोजी त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे सँपल तपासणीसाठी पाठवण्यात आले. 6 मार्च रोजी IA अहवालात H3N2 ची पुष्टी झाली आहे.

H3N2 ने देशभरात वाढवली चिंता

H3N2 इन्फ्लूएंझाच्या उद्रेकाने देशभरात चिंता वाढवली आहे. इन्फ्लूएंझा प्रकरणे अशा वेळी समोर येत आहेत जेव्हा देश तीन वर्षांनंतर कोरोना महामारीतून सावरला होता. लहान मुले आणि वृद्ध लोक या व्हायरसला मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत. डॉक्टरांच्या मते, इन्फ्लूएंझाच्या बहुतेक रुग्णांमध्ये समान लक्षणे असतात. यामध्ये खोकला, घशाचा संसर्ग, अंगदुखी, नाक गळणे याचा समावेश आहे. 

याबाबत वैद्यकीय तज्ज्ञ सतर्क झाले आहेत. त्याच्या उद्रेकाला तोंड देण्यासाठी तो मार्गदर्शक तत्त्वे आणि सूचना देत आहे. एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, H3N2 हा इन्फ्लूएंझा व्हायरसचा एक प्रकार आहे, ज्याचे रुग्ण दरवर्षी या वेळी समोर येतात. हा एक व्हायरस आहे जो कालांतराने बदलतो.

डॉ गुलेरिया म्हणतात की हा इन्फ्लूएंझा व्हायरस कोविडप्रमाणेच कणांद्वारे पसरतो. फक्त अशा लोकांना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, ज्यांना हा आजार आधीच आहे. खबरदारी म्हणून मास्क घाला, हात वारंवार धुवा, फिजिकल डिस्टंन्स ठेवा. तथापि, हे टाळण्यासाठी एक लस देखील उपलब्ध आहे. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: h3n2 virus india one death in karnataka and 6 death in all over india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.