डेटाची चोरी, पासवर्डही हॅकरला समजणार; बँक खाते होणार साफ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 01:23 PM2024-08-27T13:23:49+5:302024-08-27T13:24:17+5:30
फोनमध्ये फॅक्ट्री रिसेट करणे हा एकमेव उपाय आहे, ज्यामुळे हे काढून टाकता येते.
नवी दिल्ली : नागरिकांची लुबाडणूक करण्यासाठी सायबर चोरटे निरनिराळ्या पद्धतीचा अवलंब करू लागले आहेत. यासाठी त्यांची नजर युजर्सच्या स्मार्टफोनवर असते. हल्ली कीलॉगर सॉफ्टेवअर फोनमध्ये सोडून लुबाडणूक सुरू आहे. सिस्टममध्ये गेलेले हे सॉफ्टवेअर शोधून काढता येत नाही. कीबोर्डवर टाईप होणाऱ्या गोष्टी हे टिपून घेते.
पासवर्ड टाकताच सॉफ्टवेअर तो रेकॉर्ड करून हॅकरला पाठवते. बॅटरी वेगाने संपणे, कॅमेरा अचानक सुरू होणे ही याची लक्षणे आहेत. फोनमध्ये फॅक्ट्री रिसेट करणे हा एकमेव उपाय आहे, ज्यामुळे हे काढून टाकता येते.