काश्मिरातील लष्करी कर्मचाऱ्याचा डाटा हॅक; माेबाइल कंपनीचाही डाटा हॅक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2021 06:24 AM2021-02-07T06:24:48+5:302021-02-07T06:25:05+5:30
माेबाइल सेवा देणाऱ्या कंपनीचाही डाटा हॅक केल्याचा दावा करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमध्ये तब्बल ५५० दिवसांनी ४जी इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली. मात्र, काही तासांमध्येच हॅकर्सच्या एका गटाने लष्कराच्या एका कर्मचाऱ्याचा डाटाहॅक करून लीक केल्याचा दावा केला आहे. माेबाइल सेवा देणाऱ्या कंपनीचाही डाटा हॅक केल्याचा दावा करण्यात आला आहे.
‘रेड रॅबिट टीम’ असे या हॅकर्सच्या समूहाचे नाव आहे. लष्कराचा संबंधित कर्मचारी एका खासगी कंपनीची ४जी सेवा वापरत हाेता. त्याचा डाटा हॅक करून काही वेबसाईट्सवर टाकल्याचा दावा हॅकर्सनी केला आहे.
सायबर सुरक्षा संशाेधक राजशेखर राजहरिया यांच्या एका ट्विटवर हॅकर्सनी काही लिंक टाकल्या असून काही प्रसार माध्यमांनाही त्यात टॅग करण्यात आले आहे.