गडकरींबाबतचा प्रस्ताव स्वीकारला असता तर कोरोनाची स्थिती सरकारच्या चौकटीत राहिली असती- सुब्रमण्यम स्वामी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 01:59 PM2021-05-09T13:59:19+5:302021-05-09T14:39:38+5:30
पुन्हा भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करत केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे. (Nitin Gadkari)
नवी दिल्ली: कोरोना परिस्थिती हाताळण्यात केंद्रातील मोदी सरकारला अपयश आल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात असताना भाजपाचे राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनीही कोरोनावरून केंद्र सरकारला घरचा आहेर दिला होता. पंतप्रधान कार्यालय हे सध्याच्या कोरोना संकट काळात काहीच कामाचे नसून सध्याची कोरोनाची परिस्थिती हातळण्याची सर्व जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे सहकारी असणाऱ्या नितीन गडकरी यांच्याकडे द्यावी, अशी मागणी सुब्रमण्यम स्वामी यांनी केली होती. त्यानंतर आता पुन्हा सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करत केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे.
सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, नितीन गडकरींबाबाबतचा माझा प्रस्ताव स्वीकारला असता तर बरं झालं असतं. देशात कोरोना स्थिती बिकट होत चालली आहे. यामुळे कोरोनाविरोधी लढाईची सूत्रे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हातात द्यायला हवी, असा प्रस्ताव मी दिला होता. हा प्रस्ताव स्वीकारला असता तर आज कोरोनाची स्थिती सरकारच्या चौकटीत राहिली असती. पण आता देशातील कोरोनाच्या स्थितीवर सुप्रीम कोर्टाने समिती नेमली आहे. सॉलिसिटर जनरल कोर्टाला शरण गेले आहेत. आधी गृहमंत्रालय आदेश देत होतं. आता सरकारला सुप्रीम कोर्टाचं ऐवकावं लागणार आहे. लोकशाही देशात हा एक प्रकारे सरकारचा पराभव आहे, अशी गंभीर टीका करत सुब्रमण्यन स्वामींनी केंद्र सरकारला पुन्हा घरचा आहेर दिला आहे.
If Modi had listened to my Gadkari proposal, the Coronavirus war would have remained within the Government framework. Now SC has appointed a Committee which proposal the SG surrendered to—on instruction ( usually from HM). In a democracy this is a vote against Govt
— Subramanian Swamy (@Swamy39) May 9, 2021
तत्पूर्वी, भारतप्रमाणे इस्लामिक आक्रमणं आणि ब्रिटिश साम्राज्यवादानंतरही टिकून राहिला त्याचप्रमाणे आपण कोरोना महामारीचा सामना करून नक्कीच टिकू. आता आपण योग्य काळजी घेतली नाही, तर मुलांवर परिणाम करणारी आणखी एक लाट आपल्याकडे येईल. त्यामुळे मोदींनी या कोरोनाविरुद्धच्या युद्धाची जबाबदारी गडकरींकडे सोपवावी. पंतप्रधान कार्यालयावर अवलंबून राहणे उपयोगाचे ठरणार नाही, असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं होतं.
माझ्यापेक्षा जास्त योगदान देणारे अनेक लोक; नितीन गडकरी
सुब्रमण्यम स्वामी यांच्या या विधानावरुन आता नितीन गडकरी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मी काही उत्कृष्ट काम वैगेरे करत नाही. समाजात माझ्यापेक्षा जास्त योगदान देणारे अनेक लोक आहेत. आपले पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी, डॉक्टर, कंपाउंडर, पॅरामेडिकल आणि सरकारी कर्मचारी जीवाची बाजी लावून दिवसरात्र काम करत आहेत, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं. सामाजिक दायित्व म्हणून मी पुढाकार घेतला आहे. सध्या जात, धर्म, भाषा, पक्ष मधे न आणता सर्वांनी मानवतेच्या आधारे सेवा केली पाहिजे. सर्व लोक करत असून आपणही त्यात थोडे प्रयत्न करत आहोत, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.
वर्धा में जेनेटीक लाईफ सायन्सेस को भेंट देने के बाद मीडिया से बातचीत. pic.twitter.com/TuO6x32PZi
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) May 6, 2021