हाफिज सईद जलमार्गे दहशतवादी घुसवण्याच्या तयारीत
By admin | Published: November 7, 2016 02:12 PM2016-11-07T14:12:39+5:302016-11-07T14:18:23+5:30
लष्कर-ए-तोयबाचे म्होरक्या हाफिज सईद जलमार्गे भारतावर हल्ला करण्याचा कट आखत आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबाचे म्होरक्या हाफिज सईद पुन्हा एकदा भारतावर हल्ला करण्याचा कट आखत आहे. हाफिज त्याच्या दहशतवाद्यांना जल मार्गाने भारतात घुसवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.
लष्कर-ए-तोयबाचे 8 ते 9 दहशतवादी जम्मूमधील निक्की तवी आणि बडी तवी नद्यांचा भारतात घुसखोरी करण्यासाठी वापर करणार आहेत. यासाठी पाकिस्तानी सैन्य त्यांना मोठ्या प्रमाणात मदत करत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
हाफिज सईदने या हल्ल्याची जबाबदारी लष्कर कमांडर अबू इरफान टांडेवालावर सोपवली आहे. हाफिजच्या या कुटनितीची माहिती मिळाल्यानंतर बीएसएफने जम्मूच्या निक्की तवी आणि बडी तवी नद्यांसोबत आसपासच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे.
आणखी बातम्या
सध्या दहशतवादी आंतरराष्ट्रीय सीमरेषेवरुन भारतात घुसखोरी करण्याचे सर्वाधिक प्रयत्न करत आहेत. दरम्यान, 20 ऑक्टोबरपासून ते आतापर्यंत सहा वेळा आणि सर्जिकल स्ट्राईकनंतर जवळपास 15 वेळा आंतरराष्ट्रीय सीमारेषेवरुन दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, त्यांचे हे प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडले आहेत. यामुळेच आता हे दहशतवादी जल मार्गाद्वारे घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळत आहे.