दहशतवादी हाफिज सईदचे निकटवर्तीय निवडणुकीच्या रिंगणात; भारताची पहिली प्रतिक्रिया...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 06:04 PM2023-12-29T18:04:41+5:302023-12-29T18:05:23+5:30
मुंबईत झालेल्या 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचे निकटवर्तीय पाकिस्तानात निवडणुका लढवत आहेत.
India On Hafiz Saeed: येत्या काही महिन्यांत पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड (Mumbai Blast Mastermind) हाफिज सईदचे (Hafiz Saeed) अनेक नातेवाईक या निवडणुकीत हात आजमावत आहेत. याबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया आली आहेत. तसेच, दहशतवादी हाफिज सईदला भारताच्या स्वाधिन करण्याची विनंती पाकिस्तानला करण्यात आल्याची माहितीही परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी शुक्रवारी (डिसेंबर 29) मीडियाशी संवाद साधला. यावेळी हाफिज सईदच्या निवडणूक लढवणाऱ्या जवळच्या सहकाऱ्यांबाबत बोलताना म्हणाले की, “आम्ही याबाबत काही अहवाल पाहिले आहेत. पण, एखाद्या देशातील अंतर्गत बाबींवर भाष्य करणार नाही. अशा संघटनांचा राजकारणात प्रवेश नवीन नाही. हा त्यांच्या राजकारणाचा एक भाग आहे."
India sent relevant supporting documents to Pakistan to extradite Hafiz Saeed: MEA
— ANI Digital (@ani_digital) December 29, 2023
Read @ANI Story | https://t.co/KcdSVTPwIY#HafizSaeed#MEA#Pakistan#Indiapic.twitter.com/rPw2fAEdx7
हाफिज सईदच्या प्रत्यार्पणावर म्हणाले...
हाफिज सईदच्या प्रत्यार्पणाच्या मुद्द्यावर अरिंदम बागची म्हणाले की, “हाफिज सईद भारतात अनेक प्रकरणांमध्ये वॉन्टेड आहे. संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद्यांच्या यादीतही त्याचे नाव आहे. काही विशिष्ट प्रकरणांमध्ये त्याच्याविरोधात भारतात खटला चालवण्यासाठी त्याचे प्रत्यार्पण करण्याची विनंती आम्ही पाकिस्तानला केली आहे."
काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुरुवारी (28 डिसेंबर) पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी दावा केला होता की, हाफिज सईदच्या प्रत्यार्पणाची मागणी भारताने पाकिस्तानकडे केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी शुक्रवारी यावर प्रतिक्रिया दिली.