हेअर ड्रेसरने कापली विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याची शेंडी, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2020 11:14 AM2020-11-25T11:14:25+5:302020-11-25T11:17:31+5:30

Crime News : एका हेअर ड्रेसरला शेंडी कापणे चांगलेच महागात पडले आहे. विश्व हिंदू परिषदेच्या एका नेत्याची शेंडी कापल्याने या हेअर ड्रेसरवर गुन्हा नोंद झाला असून, त्याच्यावर तुरुंगात जाण्याचीही वेळ येण्याची शक्यता आहे.

Hairdresser cuts off Vishwa Hindu Parishad leader Shendi, charges filed | हेअर ड्रेसरने कापली विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याची शेंडी, गुन्हा दाखल

हेअर ड्रेसरने कापली विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याची शेंडी, गुन्हा दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देकेस कापत असताना हेअर ड्रेसरने या नेत्याची शेंडी कापली. हा प्रकार समोर येताच मोठा गोंधळ उडालाधार्मिक भावना दुखावण्यासाठी या हेअर ड्रेसरने जाणूनबुजून संबंधित नेत्याची शेंडी कापल्याचा आरोपकाही वेळापूर्वी पलडिया यांचे भाऊसुद्धा तिथून केस कापून गेले होते. त्यांचीही शेंडी कापलेली आढळली

देहराडून - उत्तराखंडमधील हल्द्वानी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका हेअर ड्रेसरला शेंडी कापणे चांगलेच महागात पडले आहे. विश्व हिंदू परिषदेच्या एका नेत्याची शेंडी कापल्याने या हेअर ड्रेसरवर गुन्हा नोंद झाला असून, त्याच्यावर तुरुंगात जाण्याचीही वेळ येण्याची शक्यता आहे. धार्मिक भावना दुखावण्यासाठी या हेअर ड्रेसरने जाणूनबुजून संबंधित नेत्याची शेंडी कापल्याचा आरोप करण्यात आला आहे.

केस कापत असताना हेअर ड्रेसरने या नेत्याची शेंडी कापली. हा प्रकार समोर येताच मोठा गोंधळ उडाला. तणाव वाढत असल्याचे पाहून हेअर ड्रेसर पसार झाला. दरम्यान, हे प्रकरण एवढे वाढले की अखेरीस पोलिसांना गुन्हा दाखल करून घ्यावा लागला.

विश्व हिंदू परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष विशंभर दत्त पलडिया हल्द्वानी येथील लामाचौड परिसरात राहतात. पलडिया हे सोमवारी आपल्या शेजारी असलेल्या हेअर ड्रेसरच्या दुकानात केस कापण्यासाठी पोहोचले. या दरम्यान केस कापता कापता हेअर ड्रेसरने शेंडीवरही कैची चालवली. त्यामुळे गोंधळास सुरुवात झाली. काही वेळापूर्वी पलडिया यांचे भाऊसुद्धा तिथून केस कापून गेले होते. त्यांचीही शेंडी कापलेली आढळली. दरम्यान, या हेअर ड्रेसरने जाणूनबुजून आपली शेंडी कापली, असा आरोप पलडिया बंधूंनी केला आहे.

दरम्यान, तणाव वाढल्यानंतर संबंधित हेअर ड्रेसरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच कलम २९५ अ नुसार धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणी प्रेस रिलीजसुद्धा जारी केली आहे. तसेच या प्रकरणी आरोपी असलेल्या हेअर ड्रेसरला अटकही करण्यात आली आहे.

 

Web Title: Hairdresser cuts off Vishwa Hindu Parishad leader Shendi, charges filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.