हेअरस्टाईलर जावेद हबीब भाजपात आले अन् भाजपा नेत्यांचा चेहराच बदलला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 12:55 PM2019-04-23T12:55:51+5:302019-04-23T12:57:11+5:30
प्रसिद्ध हेअर स्टाइलिस्ट आणि सलून चेनचे मालक जावेद हबीब (Jawed Habib) यांनी भारतीय जनता पार्टी (BJP) मध्ये प्रवेश केला आहे.
नवी दिल्ली - देशातील प्रसिद्ध हेअरस्टाईल डिझायनर जावेद हबीब यांनी सोमवारी भाजपात प्रवेश केला. हबीब यांच्या प्रवेशानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मेम्स व्हायरल होत आहेत. या मेम्समधून आता भाजपा नेत्यांमध्ये काय बदल होणार हे दर्शविण्यात येत असून पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांसह अनेक नेत्यांच्या हेअर स्टाईल बदलल्याचे सोशल मीडियावर दिसून येत आहे.
प्रसिद्ध हेअर स्टाइलिस्ट आणि सलून चेनचे मालक जावेद हबीब (Jawed Habib) यांनी भारतीय जनता पार्टी (BJP) मध्ये प्रवेश केला आहे. सोशल मीडियावर त्यांच्या पक्षप्रवेशाचे फोटो व्हायरल झाले आहे. ‘आधी मी फक्त केसांचा चौकीदार होता, आता देशाचा चौकीदार झालो’, असे म्हणत त्यांनी पक्षात प्रवेश केला. फोटोमध्ये हबीब यांच्या गळ्यात कमळाचे निशाण असणारे उपरणे आणि मागे भारतीय जनता पक्षाचे बॅनर दिसत आहेत. लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्याला एक दिवस बाकी असताना हबीब यांनी भाजपचा हात पकडला आहे. उद्या, 23 एप्रिल रोजी, देशातील 14 राज्यांमध्ये, 115 मतदारसंघांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील निवडणुका पार पडणार आहेत.
कोण आहेत जावेद हबीब
जावेद यांचे आजोबा लॉर्ड माउंटबॅटन यांच्यासह अनेक दिग्गजांचे हेअरकट करत असत. त्याचे वडील पंडित नेहरू आणि इंदिरा गांधींची हेअरस्टाइल करत. गांधी-नेहरू घराण्याशी त्यांच्या घराण्याचं असं जवळचं नातं असतानाही त्यांनी मात्र भाजपमध्ये प्रवेश केला आहे! जावेद हबीब यांचे 24 राज्यांमध्ये, 110 शहरांमध्ये 846 सलून आहेत. जवळजवळ 15 लाख नागरिक या सलूनची ग्राहक आहे. नुकतंच त्यांनी लिहिलेलं 'हेअर योगा' हे पुस्तक प्रकाशित झालं. केसांची काळजी कशी घ्यावी याबद्दल त्यांनी या पुस्तकात लिहिलं आहे.
जावेद हबीब यांच्या भाजपा प्रवेशानंतर नेटीझन्सला ट्रोलिंगसाठी चांगलाच विषय मिळाला. त्यानंतर, अनेक क्रिएटर नेटीझन्सची बोटं कॉम्प्युटर आणि मोबाईलच्या स्क्रीनवर चालू लागली. त्यातूनच, नरेंद्र मोदी, अमित, शहा, योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस यांसह अनेक राजकीय नेत्यांची हेअरस्टाईल बददली. तर, भाजपाविरोधी नेते अन् कलाकांराना जावेद यांच्या सलूनमधून बायकॉट केल्यानंतरचं चित्रही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Delhi: Prominent Hair Stylist Jawed Habib joins Bharatiya Janata Party, says 'Aaj tak main baalon ka chowkidar tha, aaj mein desh ka chowkidar ban gaya hoon' pic.twitter.com/eazgktBHL1
— ANI (@ANI) April 22, 2019