सपामध्ये ‘गृहकलह’
By admin | Published: September 14, 2016 05:34 AM2016-09-14T05:34:34+5:302016-09-14T05:34:34+5:30
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असतानाच समाजवादी पार्टीमध्ये गृहकलह निर्माण झाला असून, यादव कुटुंबातच अधिकाराचा वाद पेटला आहे.
लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असतानाच समाजवादी पार्टीमध्ये गृहकलह निर्माण झाला असून, यादव कुटुंबातच अधिकाराचा वाद पेटला आहे.
मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे ज्यांच्याशी मतभेत निर्माण झाले होते त्याच शिवपाल यादवांकडे अखिलेश यांच्याकडील प्रदेशाध्यक्षपद सोपवण्यात आले. सपाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनीच शिवपाल यांची ही नियुक्ती केली. दरम्यान, शिवपाल यादव यांच्याकडील खाती काढून घेण्यात आली आहेत.
सोमवारी अखिलेश यांनी दोन मंत्र्यांना बडतर्फ केले होते, तसेच मंगळवारी राज्याचे मुख्य सचिव दीपक सिंघल यांना हटवून त्यांच्या जागी राहुल भटनानगर यांची नियुक्ती केल्यानंतर काही तासांत या राजकीय घडामोडी घडल्या.
मुुलायमसिंह यादव यांनी उत्तर प्रदेश समाजवादी पार्टीच्या प्रदेशाध्यपक्षपदी तुमची नियुक्ती केली आहे. तुमच्यामुळे पक्ष अधिक भक्कम होईल, अशी आशा आहे, असे समाजवादी पार्टीचे सरचिटणीस राम गोपाल यादव यांनी शिवपाल सिंह यादव यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. पत्रावर ‘प्रति अखिलेश यादव’ असाही उल्लेख आहे. (वृत्तसंस्था)