अर्ध्या रोखीवरच चालतोय देश

By admin | Published: January 13, 2017 12:41 AM2017-01-13T00:41:57+5:302017-01-13T00:41:57+5:30

नोटाबंदीच्या काळात ५00 आणि १000 रुपयांच्या सर्व जुन्या नोटा बँकांत जमा झाल्यामुळे देशाचा आर्थिक व्यवहार केवळ

Half a cashless country | अर्ध्या रोखीवरच चालतोय देश

अर्ध्या रोखीवरच चालतोय देश

Next

मुंबई : नोटाबंदीच्या काळात ५00 आणि १000 रुपयांच्या सर्व जुन्या नोटा बँकांत जमा झाल्यामुळे देशाचा आर्थिक व्यवहार केवळ अर्ध्या रोख रकमेवरच सुरू आहे. म्हणजेच बाद करण्यात आलेल्या नोटांपैकी ६0 टक्के नोटा अजून रिझर्व्ह बँकेला चलनात आणायच्या आहेत.
त्या चलनात कधी येणार, हा प्रश्न असून, त्या येईपर्यंत चलनतुटवडा भासणार, हे उघड आहे. अर्थात नोटाबंदीपूर्वी जितके चलन देशात वापरात होते, तितके पुन्हा आणले जाणार नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली मध्यंतरी म्हणाले होते. लोकांनी अधिकाधिक कॅशलेस, डिजिटल व्यवहार करावेत, असा सरकारचा प्रयत्न आहे. ते वाढले तर नोटाबंदीपूर्वी होते, तितके चलन छापण्याची वेळ येणार नाही, अशी सरकारची भूमिका आहे. मात्र कॅशलेस वा डिजिटल व्यवहारांना आतापर्यंत प्रचंड म्हणावा, असा प्रतिसाद मिळालेला नाही.
स्टेट बँकेच्या चेअरपर्सन अरुंधती भट्टाचार्य यांच्या मते बँकांकडे पुरेसे चलन येण्यास आणि लोकांना ते पुरेशा प्रमाणात देण्यास फेब्रुवारी उजाडेल. पण काहींच्या मते आणखी दोन महिने चलनतुटवडा भासण्याची शक्यता आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांमुळे तेथे आणि ग्रामीण भागांत पुरेशा प्रमाणात चलनपुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रिझर्व्ह बँकेच्या ताज्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. नोटाबंदीची मुदत संपल्यानंतरही देशाच्या चलनात ८.९६ लाख कोटी रुपयांच्याच नोटा आहेत. नोटाबंदीच्या आधी ४ नोव्हेंबर रोजी १७.९७ लाख कोटींच्या नोटा चलनात होत्या. याचाच अर्थ सध्या चलनात असलेल्या नोटांचे प्रमाण आधीच्या तुलनेत ५0.0४ टक्के इतकेच आहे. स्टेट बँक आॅफ इंडियाचे मुख्य आर्थिक सल्लागार सौम्य कांती घोष यांनी सांगितले की, डिसेंबर अखेरपर्यंत रिझर्व्ह बँकेने सुमारे ४१ टक्के नव्या नोटा चलनात आणल्या होत्या. जानेवारी अखेरपर्यंत हे प्रमाण ६0 टक्के होईल.
केअर रेटिंग्ज या संस्थेचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस यांनी सांगितले की, अनेक बँकांमध्ये जमा असलेल्या नोटांबाबत वादही आहेत. या पार्श्वभूमीवर ३0 डिसेंबरनंतरही काही नोटा रिझर्व्ह बँकेकडे येऊ शकतात.
१0 डिसेंबर २0१६ रोजी रिझर्व्ह बँकेने जमेचा आकडा १२.४४ लाख कोटींचा होता. त्यात सुधारणा केली जाऊ शकते. (वाणिज्य प्रतिनिधी)

आकड्यांमध्ये असू शकतो घोळ

 ५ जानेवारीला जारी केलेल्या निवेदनात रिझर्व्ह बँकेने म्हटले की, बँकांत जमा झालेल्या जुन्या नोटांची आकडेवारी रिझर्व्ह बँकेकडे आली आहे.
हे आकडे आणि प्रत्यक्ष तिजोरीत असलेल्या नोटा यांचा मेळ घालून पाहण्याची गरज आहे. मोजदादीतील चुका अथवा एकच रक्कम दोन वेळा मोजली जाण्याची शक्यता असे प्रकार होऊ शकतात.
असे प्रकार टाळण्यासाठी कागदावरील आकडे आणि तिजोऱ्यांतील नोटा यांचा मेळ घातला जात आहे.
१0 डिसेंबर २0१६ रोजी रिझर्व्ह बँकेचा जमेचा आकडा 12.44लाख कोटींचा होता.

Web Title: Half a cashless country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.