अर्ध्या शहराचा आज वीजपुरवठा बंद देखभाल व दुरुस्तीची कामे : महावितरण काढणार नागरिकांचा घाम

By Admin | Published: June 19, 2015 02:21 AM2015-06-19T02:21:28+5:302015-06-19T14:07:59+5:30

औरंगाबाद : महावितरणतर्फे शहरातील विभाग-१ आणि विभाग-२ मधील भागात १९ जून रोजी देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील विविध भागांतील वीजपुरवठा सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. दिवसभर वीजपुरवठा बंद राहणार असल्यामुळे शहरवासीयांना गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.

Half a city today, electricity supply shutdown and repair works: People will be forced to pay Mahavitaran | अर्ध्या शहराचा आज वीजपुरवठा बंद देखभाल व दुरुस्तीची कामे : महावितरण काढणार नागरिकांचा घाम

अर्ध्या शहराचा आज वीजपुरवठा बंद देखभाल व दुरुस्तीची कामे : महावितरण काढणार नागरिकांचा घाम

googlenewsNext

औरंगाबाद : महावितरणतर्फे शहरातील विभाग-१ आणि विभाग-२ मधील भागात १९ जून रोजी देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील विविध भागांतील वीजपुरवठा सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. दिवसभर वीजपुरवठा बंद राहणार असल्यामुळे शहरवासीयांना गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.
नारेगाव, टाऊन सेंटर, कॅनॉट, सिडको बसस्थानक, राज टॉवर, एबीसीडीई सेक्टर, ब्रिजवाडी, मसनतपूर, शहानगर, अयोध्यानगर, एन-७, एन-८ सिडको, म्हाडा, पवननगर, शिवनेरी कॉलनी, रोशनगेट, कटकटगेट, बाबर कॉलनी, पोलीस कॉलनी, बजरंग चौक, जिजामाता कॉलनी, गुलमोहर कॉलनी इ. भागांत देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे. याशिवाय चितेगाव फिडरवरील भाग, नक्षत्रवाडी गाव, समतानगर, हिंदुस्तान लिव्हर, वेदांतनगर, बन्सीलालनगर, म्हाडा कॉलनी या भागांतील वीजपुरवठा सकाळी ११ ते २ यावेळेत बंद राहणार आहे. सिमेन्स फिडर, एम सेक्टर फिडरवरील ई-सेक्टर, एल सेक्टर, जी सेक्टर, एम सेक्टर भागांत सकाळी १०.३० ते १.३० तसेच बजाजनगर, डब्ल्यू सेक्टर, एक्स सेक्टर, सी सेक्टर वॉटर वर्क, एमआयडीसी वाळूज, बाबा पेट्रोलपंप, बन्सीलालनगर, गोविंदनगर, रेल्वेस्टेशन, बनेवाडी, क्रांतीनगर, पदमपुरा, छावणी, नंदनवन कॉलनी, गवळीपुरा, शांतीपुरा, भावसिंगपुरा, पटेल चौक, के सेक्टर या भागांत सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे. राहुलनगर, गोलवाडी, एमआयडीसी रेल्वेस्टेशन, एकनाथनगर, कबीरनगर, मिलिंदनगर, नागसेननगर, ईटखेडा, सिल्क मिल कॉलनी, म्हाडा, शहानगर या भागांतील वीजपुरवठा सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
फांद्यांचा विळखा
शहरातील विविध भागांत विद्युत वाहिन्या झाडांच्या फांद्यांमध्ये अडकल्याचे दिसून येत आहे. मान्सूनपूर्व तयारीमध्ये झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याचे अपेक्षित आहे; परंतु अद्यापही अनेक भागांत विद्युत वाहिन्यांना झाडांच्या फांद्यांचा विळखा कायम आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महावितरणकडून देखभाल-दुरुस्तीचे काम होत आहे.

Web Title: Half a city today, electricity supply shutdown and repair works: People will be forced to pay Mahavitaran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.