उत्पन्नाशिवाय महिनाही जगू शकत नाहीत निम्मे भारतीय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 04:00 AM2020-06-12T04:00:34+5:302020-06-12T04:00:54+5:30
आयएनएएससी वोटर इकॉनॉमी बॅटरी वेव्ह सर्व्हेनुसार २८.२ टक्के पुरुषांनी सांगतले की, उत्पन्नाशिवाय ते एक महिन्यापेक्षा कमी काळ जगू शकतात
नवी दिल्ली : जवळपास निम्मे भारतीय नोकरी किंवा उत्पन्नाच्या साधनाशिवाय एक महिन्यापेक्षा अधिक काळ जगू शकत नाहीत, असे एका पाहणीतून समोर आले आहे. त्यामुळेच लॉकडाऊन काळात बहुतांश नोकरी-धंदा करणाऱ्यांनी मूळगावी धाव घेतल्याचे दिसून आले आहे.
आयएनएएससी वोटर इकॉनॉमी बॅटरी वेव्ह सर्व्हेनुसार २८.२ टक्के पुरुषांनी सांगतले की, उत्पन्नाशिवाय ते एक महिन्यापेक्षा कमी काळ जगू शकतात, तर २०.७ टक्के म्हणाले की, कोणत्याही उत्पन्नाशिवाय ते एक महिना जगू शकतात तर १०.७ टक्के म्हणाले की, कोणत्याही उत्पन्नाशिवाय ते एक वर्षभर जगू शकतात, तर कोणत्याही उत्पन्नाशिवाय दोन महिने जगू शकणारे १०.२ टक्के, तीन महिने जगू शकणारे ८.३ टक्के होते तर ४-६ महिने जगू शकणारे ९.७ टक्के इतके पुरुष होते.