साडेतीन लाख कामगारांना मंदीमुळे ‘ले ऑफ’
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 04:10 AM2019-09-05T04:10:37+5:302019-09-05T04:10:44+5:30
राजधानीच्या दक्षिणेकडे असलेला मनेसर परिसर देशात आॅटोमोटिव्ह हब ओळखला जातो
नवी दिल्ली : देशातील वाहन उद्योग मंदीच्या तडाख्यामध्ये सापडला असून, त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होत आहे. चालू वर्षात या उद्योगातील सुमारे साडेतीन लाख कामगारांना ले आॅफ देण्यात आला. देशाचे आॅटोमोटिव्ह हब म्हणून नावारूपाला आलेल्या मनेसर परिसरातील जवळपास सर्वच कुटुंबांना याची झळ पोहोचत आहे. या परिसरातील छोट्या व्यावसायिकांच्या उत्पादनावरही मंदीचा परिणाम झाला आहे.
राजधानीच्या दक्षिणेकडे असलेला मनेसर परिसर देशात आॅटोमोटिव्ह हब ओळखला जातो. येथे मारुती उद्योग तसेच दुचाकी उत्पादनातील अग्रेसर होंडा मोटर कंपनी यांचे मोठे प्रकल्प आहेत; मात्र वाहन उद्योगातील मंदीचा मोठा फटका येथे बसत आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून सुमारे साडेतीन लाख कामगारांना ले आॅफ देण्यात आला. याचा परिणाम त्यांच्या कौटुंबिक जीवनावरही झाला आहे. येथील नागरिकांची जीवनरेखा असणारे हे उद्योग त्यांना पुरेसा रोजगार देऊ शकत नसल्याने या कुटुंबाचे उत्पन्न कमी झाले आहे.