न्यायमूर्तीपदासाठी कॉलेजियमने सुचवलेली निम्मी नावे केंद्राने पाठवली परत
By admin | Published: November 11, 2016 02:09 PM2016-11-11T14:09:10+5:302016-11-11T14:11:51+5:30
न्यायाधीशांच्या नियुक्तीवरुन पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - न्यायाधीशांच्या नियुक्तीवरुन पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदावर नियुक्तीसाठी न्यायमूर्तीच्या कॉलेजियमने ७७ नावांची शिफारस केली होती.
त्यातील निम्मी नावे कॉलेजियमकडे परत पाठवल्याची माहिती केंद्राने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाला दिली. देशाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील कॉलेजियमने ७७ नावांची शिफारस केली होती.
त्यातील ३४ जणांची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती केली उर्वरित ४३ नावे परत पाठवून दिली. न्यायधीश नियुक्तीच्या पद्धतीवरुन केंद्र सरकार आणि न्यायव्यवस्थेमध्ये काही मतभेदांचे मुद्दे आहेत.