बंगळुरूमधील अर्धे लोक परप्रांतीय, नोकरीपासून, व्यवसायांपर्यंत एवढे लाख लोक आहेत बाहेरील  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 05:37 PM2024-07-18T17:37:23+5:302024-07-18T17:39:01+5:30

Bengaluru News: कर्नाटकधील मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने खासगी नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना १०० टक्के आरक्षण देण्याच्या विधेयकाला नुकतीच मान्यता दिली होती. मात्र या निर्णयाला विरोध झाल्यानंतर सरकारने या विधेयकाला स्थगिती दिली होती. त्या पार्श्वभूमीवर आता बंगळुरूमध्ये परप्रांतियांची संख्या किती आहे आणि ते काय काम करतात, याची आकडेवारी समोर आली आहे. 

Half of the people in Bangalore are expats, from jobs, to businesses, so many lakhs of people are outside   | बंगळुरूमधील अर्धे लोक परप्रांतीय, नोकरीपासून, व्यवसायांपर्यंत एवढे लाख लोक आहेत बाहेरील  

बंगळुरूमधील अर्धे लोक परप्रांतीय, नोकरीपासून, व्यवसायांपर्यंत एवढे लाख लोक आहेत बाहेरील  

कर्नाटकधील मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने खासगी नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना १०० टक्के आरक्षण देण्याच्या विधेयकाला नुकतीच मान्यता दिली होती. मात्र या निर्णयाला विरोध झाल्यानंतर सरकारने या विधेयकाला स्थगिती दिली होती. दरम्यान, कर्नाटक सरकारच्या या निर्णयानंतर बंगळुरूमध्ये मोठ्या प्रमाणात बाहेरील लोक वास्तव्यास आहेत, त्यामुळे खासगी कंपन्यांना नियुक्त्या करताना अडचणी येऊ शकतात, असे बोलले जात होते.  त्या पार्श्वभूमीवर आता बंगळुरूमध्ये परप्रांतियांची संख्या किती आहे आणि ते काय काम करतात, याची आकडेवारी समोर आली आहे. 

२०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार त्यावेळी कर्नाटकची लोकसंख्या ६.११ कोटी रुपये होती. त्यामध्ये ३.६ टक्के लोक हे परप्रांतीय म्हणजे बाहेरील लोकांकडून आलेले होते. जनगणनेच्या आकडेवारीनुसार कर्नाटकमध्ये येणाऱ्या लोकांमध्ये ६.४ लाख लोक हे तामिळनाडूमधील आहेत. तर आंध्र प्रदेशातील ४.४ लाख, केरळमधील २.३ लाख, उत्तर प्रदेशमधील १.४ लाख, बिहारमधील १.२ लाख, महाराष्ट्रातील १.१ लाख आणि इतर राज्यांमधील ३.२ लाख लोक होते. म्हणजेच सुमारे ३२ लाख लोक हे परप्रांतीय होते. आता ही आकडेवारी बदलण्याची शक्यता आहे. 

एका रिपोर्टनुसार २०१९ मध्ये बंगळुरूमध्ये राहणाऱ्या लोकांपैकी ५० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या ही बाहेरून आलेल्यांची आहे. बंगळूरूमध्ये ४४.३ लाख लोक हे बाहेरील राहणारे आहेत. हा आकडा बंगळुरूच्या एकूण लोकसंख्येपैकी ५०.६० टक्के आहे.  उल्लेखनीय बाब म्हणजे ही संख्या कर्नाटकमधून बाहेर जाणाऱ्या लोकांच्या संख्येपेक्षा खूप अधिक आहे. एका अहवालानुसार कर्नाटकमधून बाहेर जाणाऱ्या लोकांची संख्या ही २५ लाख आहे. 

बंगळुरूचा विचार करायचा झाल्यास २०११ च्या जनगणनेनुसार बंगळुरूची लोकसंख्या ९६.२ लाख एवढी होती. त्यामध्ये ४४.३ लाख लोक हे परप्रांतीय होते. मात्र नंतर सुधारीत आकडेवारी समोर आलेली नाही. मात्र आता या आकडेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. ही आकडेवारी ग्रामीण आणि शहरी अशी दोन्ही भागांमधील आहे. येथे येणाऱ्या लोकांमध्ये सर्वाधिक संख्या ही आंध्र प्रदेशमधील लोकांची आहे. त्यांची आकडेवारी ३४ टक्के आहे. त्यानंतर केरळचा नंबर लागलोत. तर शेजारील राज्यांनंतर बंगळुरूमध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांमध्ये राजस्थानमधून येणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे.

या रिपोर्टनुसार २००१ च्या जनगणनेदरम्यान, बंगळुरूमधील लोकसंख्या ही ६५ लाख ३७ हजार एवढी होती. त्यामध्ये २०.८ लाख स्थलांतरीत झालेले होते. ही संख्या २०११ मध्ये वाढून ती ४४.३ लाख एवढी झाली. ही संख्या दुप्पटीहून अधिक झालेली आहे. अशा परिस्थितीत पुढील जनगणनेवेळी बंगळुरूमध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या ही आणखी वाढण्याची शक्यता आहे.  

Web Title: Half of the people in Bangalore are expats, from jobs, to businesses, so many lakhs of people are outside  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.