राज्यात निम्मेच पाऊस; लाखभर मजूर रोहयोवर
By admin | Published: September 7, 2015 11:27 PM2015-09-07T23:27:36+5:302015-09-07T23:27:36+5:30
राज्यात निम्मेच पाऊस;
Next
र ज्यात निम्मेच पाऊस;लाखभर मजूर रोहयोवरमुंबई - राज्यात यंदा सरासरीच्या केवळ ५५ टक्केच पाऊस पडला असून ४९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सुमारे एक लाख मजूर रोजगार हमी योजनेवर मजुरी करीत आहेत. राज्यात आतापर्यंत ५३८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तो सरासरीच्या (९७६ मिमी) जवळपास निम्मा आहे. अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर,भंडारा,गोंदिया या सहा जिल्ह्यांत ७६ ते १०० टक्के पाऊस झाला आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, जळगाव, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, जालना, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली या १८ जिल्ह्यांमध्ये ५१ ते ७५ टक्के पावसाची नोंद झाली असून नाशिक, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, यवतमाळ या दहा जिल्ह्यांत २६ ते ५० टक्के पाऊस पडला आहे. राज्यातील ३५५ तालुक्यांपैकी सहा तालुक्यात सरासरीच्या तुलनेत ० ते २५ टक्के, १२६ तालुक्यात २६ ते ५० टक्के, १४३ तालुक्यात 51 ते 75 टक्के, ६८ तालुक्यात ७६ ते १०० आणि १९ तालुक्यात १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. राज्यात २ हजार ११० टँकर्सद्वारा १६३८ गावे आणि ३०८२ वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. रोजगार हमी योजनेच्या १२ हजार ८५९ कामांवर ९२ हजार मजूर राबत आहेत. (विशेष प्रतिनिधी)