Target Killing : अर्ध्यावरती डाव मोडला! 3 महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न; काश्मीरमध्ये मारलेल्या बँक मॅनेजरवर अंत्यसंस्कार 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 07:58 PM2022-06-03T19:58:31+5:302022-06-03T20:01:04+5:30

Target Killing : सकाळी सातच्या सुमारास बेनिवाल यांच्या पत्नी पतीचा मृतदेह घेऊन भगवान गावात पोहोचल्या. मुलाचा मृतदेह पाहून वडील बेशुद्ध पडले. काही वेळातच अंत्यसंस्कार करण्यात आले.

Halfway through the innings! The marriage took place 3 months ago; Was married; Funeral on bank manager killed in Kashmir | Target Killing : अर्ध्यावरती डाव मोडला! 3 महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न; काश्मीरमध्ये मारलेल्या बँक मॅनेजरवर अंत्यसंस्कार 

Target Killing : अर्ध्यावरती डाव मोडला! 3 महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न; काश्मीरमध्ये मारलेल्या बँक मॅनेजरवर अंत्यसंस्कार 

googlenewsNext

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यातील रहिवासी विजय बेनिवाल यांच्यावर शुक्रवारी त्यांच्या मूळ गावी भगवान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शुक्रवारी सकाळी त्यांचे पार्थिव काश्मीरहून गावात पोहोचले. बेनिवाल यांचा अंत्यसंस्कार गावातील स्मशानभूमीत करण्यात आले आणि त्यात शेकडो लोक उपस्थित होते. सकाळी सातच्या सुमारास बेनिवाल यांच्या पत्नी पतीचा मृतदेह घेऊन भगवान गावात पोहोचल्या. मुलाचा मृतदेह पाहून वडील बेशुद्ध पडले. काही वेळातच अंत्यसंस्कार करण्यात आले.

तीन महिन्यांपूर्वी लग्न झाले
विजयने जुलैमध्ये गावाला आपल्या घरी येण्याचं आश्वासन दिले होते. मात्र, लग्नानंतर तो गावी परतलाच नाही. त्याला आपले कॅडर बदलायचे होते आणि त्यासाठी परीक्षाही दिली होती. बँक मॅनेजर बेनिवाल यांचे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाले असून ते पत्नीला घेऊन काश्मीरला गेले होते. बेनिवाल यांच्या वडिलांनी सांगितले, "माझा मुलगा परीक्षेची तयारी करत होता, जेणेकरून त्याला इतरत्र शाखा व्यवस्थापकाची नोकरी मिळावी. त्याने राजस्थानला परत यावे, अशी आमची इच्छा होती."

गोळी लागल्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याला वाचवता आले नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. हल्ल्याच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक दहशतवादीबँकेत घुसून विजय बेनिवाल यांच्यावर गोळीबार करताना दिसत आहे. बेनिवाल यांची कुलगाम जिल्ह्यातील आरेह मोहनपोरा येथे असलेल्या एलकवाई देहाती बँकेत (ईडीबी) व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

विजयच्या पत्नीने 2 दिवसांपूर्वी चिंता व्यक्त केली होती
विजय कुमारच्या पत्नीने कुटुंबीयांना सांगितले की, दोन दिवसांपूर्वी तिथल्या एका शिक्षकाची हत्या झाल्यापासून विजय कुमारही चिंतेत होता आणि सांगत होता की इथली परिस्थिती बिकट होत चालली आहे. आपल्याला जाण्याची गरज आहे. त्याने कोणताही निर्णय घेण्यापूर्वीच दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली.

Web Title: Halfway through the innings! The marriage took place 3 months ago; Was married; Funeral on bank manager killed in Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.