Kashmir Attack: काश्मीर बिहारींना सोपवा, १५ दिवसांत सुधारुन दाखवू; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 10:30 AM2021-10-18T10:30:55+5:302021-10-18T10:31:45+5:30

जम्मू काश्मीरमध्ये लष्करी जवानांच्या दहशतवादविरोधी कारवायांना कंटाळून दहशतवाद्यांनी एकामागोमाग एक गैर काश्मीरी लोकांना निशाणा बनवलं आहे.

Hand over Kashmir to Bihari people, improve in 15 days; Jitan Ram Manjhi demand to PM Narendra Modi | Kashmir Attack: काश्मीर बिहारींना सोपवा, १५ दिवसांत सुधारुन दाखवू; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी

Kashmir Attack: काश्मीर बिहारींना सोपवा, १५ दिवसांत सुधारुन दाखवू; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी

Next

पटना – जम्मू काश्मीर दहशतवाद्यांकडून बाहेरील लोकांना टार्गेट करण्यावरुन बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी काश्मीरची जबाबदारी बिहारी लोकांवर द्यावी. १५ दिवसांत परिस्थिती सुधारुन दाखवू असा इशाराच त्यांनी दिला आहे.

जम्मू काश्मीरमध्ये लष्करी जवानांच्या दहशतवादविरोधी कारवायांना कंटाळून दहशतवाद्यांनी एकामागोमाग एक गैर काश्मीरी लोकांना निशाणा बनवलं आहे. रविवारी दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी बिहारच्या दोन मजुरांची हत्या केली. बिहारमध्ये राहणाऱ्या या मृत मजुरांचे नाव राजा आणि जोगिंदर असं होतं. शनिवारी दहशतवाद्यांनी पुलवामा आणि श्रीनगर येथे दोन लोकांची गोळी मारुन हत्या केली. श्रीनगरमध्ये राहणाऱ्या बिहारी अरविंद कुमारला निशाणा बनवण्यात आलं. तर पुलवामा येथील रहिवासी सगीर अहमद याचीही हत्या करण्यात आली.

या घटनांबाबत माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी ट्विट करुन सांगितलं आहे की, काश्मीरमध्ये वारंवार होणाऱ्या गरीब बिहारी लोकांच्या हत्येने मन व्यथित झालं आहे. जर परिस्थितीत बदल होत नसतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आग्रह आहे की, काश्मीरची जबाबदारी बिहारींवर द्या, १५ दिवसांत परिस्थिती बदलून दाखवू असं त्यांनी म्हटलं आहे.

काश्मीरमध्ये काय घडतंय?

दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये अल्पसंख्याक आणि परप्रातींयांना निशाणा बनवत आहेत. दहशतवाद्यांविरोधात सैन्यानं हल्लाबोल केला आहे. आतापर्यंत ७०० हून अधिक लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. सुरक्षा जवानांनी अनेक भागात ऑपरेशन सुरु केले आहे. त्यामुळे भडकलेल्या दहशतवाद्यांनी परप्रांतीयांना निशाणा बनवलं आहे. बिहारमधील २ मजुरांची रविवारी कुलगाममध्ये हत्या करण्यात आली. या महिन्यात सर्वसामन्यांना दहशतवाद्यांकडून टार्गेट केले जात आहे.

अरविंद कुमार साह हा बिहारच्या बांका जिल्ह्यातील रहिवासी आहे. श्रीनगरमधील ईदगाह परिसरात एका पार्कच्या बाहेर तो पाणीपुरी विकतो. दहशतवाद्यांनी त्याची हत्या केली. बिहारच्या मुख्यमत्र्यांनी त्याच्या कुटुंबाला २ लाखाच्या मदतीची घोषणा केली आहे. बिहारच्या भागलपूर येथील वीरेंद्र पासवान श्रीनगरच्या लाल बाजारातील फेरीवाला आहे. दहशतवाद्याने त्यालाही गोळ्या झाडून ठार केले. या महिनाभरात दहशतवाद्यांनी ११ जणांना ठार केले आहे.

Web Title: Hand over Kashmir to Bihari people, improve in 15 days; Jitan Ram Manjhi demand to PM Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.