दिव्यांग बहिणीने असे ओवाळले भावाला, फोटो पाहून आवरणार नाहीत अश्रु

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2017 06:47 PM2017-10-24T18:47:37+5:302017-10-24T19:16:58+5:30

दिव्यांग बहिणीने भाऊबीजेला आपल्या भावाला असे ओवाळले आणि आशिर्वादही दिले.

handicapped sister celebrated BhaiDooj with brother, photo will make you emotional | दिव्यांग बहिणीने असे ओवाळले भावाला, फोटो पाहून आवरणार नाहीत अश्रु

दिव्यांग बहिणीने असे ओवाळले भावाला, फोटो पाहून आवरणार नाहीत अश्रु

Next
ठळक मुद्देआपल्या भाऊ-बहिणींवर प्रेम दाखवण्यासाठी कित्येकांनी सोशल मीडियाचा आधार घेतला. अपंग असूनही ती तिच्या कामासाठी कोणावरच अवलंबून नसते. भाऊबीजेला आणि रक्षाबंधनाला ती आपल्या भावाला कधीच ओवाळू शकत नव्हती.

नुकताच आपण सर्वांनी भाऊबीज सण साजरा केला. आपल्या भाऊ-बहिणींवर प्रेम दाखवण्यासाठी कित्येकांनी सोशल मीडियावर फोटो, काव्य, लेख या साहित्यांचा आधार घेतला. रक्षाबंधन आणि भाऊबीजेदिवशीच भाऊ किंवा बहिणींची आठवण काढणाऱ्या नेटकऱ्यांना मात्र एका फोटोने चांगलाच धडा मिळाला असेल. दिव्यांग असलेल्या एका बहिणीने आपल्या  भावाला चक्क पायांनी ओवाळलं. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. लोकांनी या भावा-बहिणींमधलं प्रेम असंच कायम राहावं, याकरता शुभेच्छाही दिल्या.


बंगालमध्ये राहणाऱ्या सम्राट बासू याने हा फोटो शेअर केला आहे. त्याची मोठी बहिण लहानपणापासून अपंग आहे. तिला चालता येत नाही आणि हाताने कामेही करता येत नाही. पण तरीही ती तिच्या कामासाठी कोणावरच अवलंबून नसते. तिला जमेल तसं हळूहळू ती आपली स्वतःची कामं करते. 
भाऊबीजेला आणि रक्षाबंधनाला ती आपल्या भावाला कधीच ओवाळू शकत नव्हती. याची कायम त्या दोघांना खंत असते. त्यामुळे तिने यावर्षी आपल्या पायानेच भावाचं औक्षण केलं आणि पायानेच त्याला आर्शिवादही दिला. तिचा भाऊ सम्राट बासू याने फेसबूकवर हा फोटो शेअर केला. क्षणार्धात या फोटोवर  कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पडला.

Web Title: handicapped sister celebrated BhaiDooj with brother, photo will make you emotional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.