अभिनव विद्यालयात हस्तकला प्रदर्शन

By Admin | Published: March 23, 2016 12:10 AM2016-03-23T00:10:44+5:302016-03-23T00:10:44+5:30

जळगाव : माहेश्वरी विद्याप्रसारक मंडळ संचलित अभिनव विद्यालयात हस्तकलेच्या वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन सरकारी वकील ॲड.अनुराधा वाणी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक हेमंत पाटील, मुख्याध्यापिका सरोज तिवारी उपस्थित होते.

Handicraft exhibition in Abhinav Vidyalaya | अभिनव विद्यालयात हस्तकला प्रदर्शन

अभिनव विद्यालयात हस्तकला प्रदर्शन

googlenewsNext
गाव : माहेश्वरी विद्याप्रसारक मंडळ संचलित अभिनव विद्यालयात हस्तकलेच्या वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन सरकारी वकील ॲड.अनुराधा वाणी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक हेमंत पाटील, मुख्याध्यापिका सरोज तिवारी उपस्थित होते.
हस्तकलेच्या वेगवेगळ्या वस्तू विद्यार्थ्यांनी तयार केल्या होत्या. त्यात मातीपासून विविध प्रकारची फळे, केक, मोबाइल, इतर शो-पीसच्या वस्तू यांचा समावेश होता. गोणपाटच्या दोरीपासून वालपीस, कापूस व कापडापासून बाहुल्या, काचेपासून इमारत, बाटलीपासून रॉकेट व विमानदेखील तयार करण्यात आले होते. इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात सहभाग नोंदवला. या प्रदर्शनात खुशी नितीन जडे, चैतन्य काबरा, ललित पुंडलिक साळुंके, वीरेंद्र वाल्हे, कल्पेश ओतारी, विशाल शंकपाळ, सुनील जाधव यांनी बक्षिसे मिळवली. कार्यक्रमाला साधना कोल्हे, वैशाली पाटील, नयना मोरे, प्रेमसिंग चव्हाण, सजन तडवी, अनिल जोशी, शिल्पा रावतोळे, कांता मोरे, सुषमा जोशी, ज्योतीबाला जाधव, पंकज पाटील, हर्षदा काळे, नीशा भालेराव, वर्षा अकोले, पूजा सोनवणे, प्रतिभा नगरधने, विष्णू ठाकरे उपस्थित होते.

Web Title: Handicraft exhibition in Abhinav Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.