बाबा रामदेव यांच्या वागणूकीवर संतापले हंसल मेहता, हा 'इडियट' माणूस...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 11:32 AM2021-05-26T11:32:11+5:302021-05-26T12:01:47+5:30
एका टीव्ही डिबेटमध्ये आयएमएच्या माजी अध्यक्षांनी आणि पदाधिकाऱ्यांना रामदेव यांना चांगलाच फैलावर घेतलं. त्यानंतर, आता हंसल मेहता यांनीही बाबा रामदेव यांना इडियट म्हटलं आहे.
मुंबई - योगगुरु रामदेव बाबा (Baba Ramdev) यांनी एलोपॅथी उपचारपद्धतीवर टीका केल्यानंतर चांगलाच वाद उफाळून आला आहे. बाबा रामदेव यांनी एलोपॅथीनंतर पुन्हा एकदा डॉक्टरांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. रविवारी आरोग्य मंत्र्यांने झापताच रामदेव बाबांनी अॅलोपथीवरील वक्तव्य मागे घेत असल्याचे म्हटले होते. मात्र, मी कोणतीही पदवी न घेता डॉक्टर बनलो, अॅलोपथीचे डॉक्टर कोरोनामुळे मृत्यूमुखी कसे पडतात असा सवाल केला आहे. आता, सिनेनिर्माता हंसल मेहता यांनीही बाब रामदेव यांना चांगलंच सुनावलं आहे.
एका टीव्ही डिबेटमध्ये आयएमएच्या माजी अध्यक्षांनी आणि पदाधिकाऱ्यांना रामदेव यांना चांगलाच फैलावर घेतलं. त्यानंतर, आता हंसल मेहता यांनीही बाबा रामदेव यांना मूर्ख म्हटलं आहे. रामदेव बाबांनी ट्विट करत आयएमएला २५ प्रश्न विचारले आहेत. अमेरिकेचे डॉक्टर बोलतात, डब्ल्यूएचओ म्हणते तेव्हा का नाही बोलत कोणी? मी जर डॉक्टरांचा आणि मेडिकल सायन्सचा सन्मान करतो, तर तुम्ही आयुर्वेदाचा सन्मान का करत नाही असा सवाल त्यांना केला आहे. त्यावरुन, पुन्हा एकदा रामदेव बाबांवर टीका करण्यात आलीय.
बाबा रामदेव यांच्या या ट्विटला रिट्विट करत, हा इडियट माणूस आमच्या फ्रंटलाईन वर्कर्सचा मौल्यवान वेळ वाया घालवत आहे, असे हंसल मेहता यांनी म्हटलंय.
This idiot is wasting precious time of our frontline workers. https://t.co/kcdEEtFe7z
— Hansal Mehta (@mehtahansal) May 25, 2021
आयुर्वेदावर टीका करणे, शिव्या का दिल्या जातात. फार्मा कंपन्या खूप आहेत, मग डॉक्टर त्यांचे बळी का ठरत आहेत. डॉक्टर तर एका फार्मा कंपनीचा प्रतिनिधी नसतो, अशा शब्दांत रामदेव बाबांनी 25 सवाल आयएमएला केले आहेत. त्यावरुन, हंसल मेहता यांनी बाबांना मूर्ख म्हटलं आहे.
डॉ. लेलेंनी केली बोलती बंद
बाबा रामदेव यांच्या अॅलोपॅथीसंदर्भातील व्हिडिओनंतर आयोजित आज तकच्या डिबेट शोमध्ये डॉ. लेले जयेश लेले यांनी बाबा रामदेव यांची बोलती बंद केली. डॉ. लेले अॅलोपॅथीसंदर्भात बोलत असताना बाबा रामदेव मध्ये-मध्ये बोलायचे. त्यावरुन, डॉ. लेले चांगलेच संतापले होते. ऐ चुप्प... चुप्प... असे म्हणत लेले यांनी रामदेव बाबांची बोलती बंद केली. त्यानंतर, बाबांनीही प्रतिक्रिया देत आप कौन है.. मुझे चुप बैठानेवाले असे म्हणत उत्तर दिले. मात्र, सोशल मीडियावर डॉ. लेले यांचा व्हिडिओ व्हायरल होत असून त्यांना समर्थन मिळत आहे. तर, काहीजण डॉ. लेलेंना ट्रोलही करत आहे. पण, सोशल मीडियावर ते व्हायरल होत आहेत.
कोण आहेत डॉ. जयेश लेले
डॉक्टर लेले हे मूळ महाराष्ट्रातील मुंबईचे असून सध्या जनपद येथे मेडीकल प्रॅक्टीस करत आहेत. लेले यांनी शेठ जीएस. मेडिकल कॉलेजमधून 1972 साली एमबीबीएसची पदवी घेतली असून सध्या ते इंडियन मेडिकल असोसिएशनेच सरचिटणीस आहेत. यापूर्वी महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. जयेश लेले हे बालरोगतज्ञ असून वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना अनेकदा सन्मानित करण्यात आल आहे.